आषाढी एकादशीनिमित्त विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे
जाणाऱ्या भाविक वारकऱ्यांसाठी दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड विभागातून
तीन विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला असून,
Related News
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना दिशादर्शन :
लज्जास्पद! छत्तीसगडमध्ये सख्ख्या भावाकडून दोन वर्ष बहिणीवर बलात्कार;
समस्तीपूरमध्ये सात लाखांची लूट, दोन भावांवर गोळीबार;
IPL 2025 : प्लेऑफसाठी ‘करो या मरो’ सामना, मुंबई विरुद्ध दिल्ली…
ई-पासपोर्टची सुरुवात भारतात : प्रवास अधिक सुरक्षित आणि वेगवान होणार,
मुंबई विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आग, शॉर्टसर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती
संभळ जामा मशिदीच्या सर्वे प्रकरणात मुस्लिम पक्षाला झटका;
भारतभरात पाकिस्तानसाठी काम करणारे गुप्तहेर उघड!
‘जासूस’ ज्योती मल्होत्रा प्रकरणात नवा खुलासा!
‘ऑपरेशन सिंदूर’ प्रतिनिधिमंडळापासून ममता यांची तुटवड;
Jammu-Kashmir: शोपियांमध्ये दहशतवाद्यांच्या दोन साथीदारांना अटक:
उत्तर प्रदेशच्या शाळांमध्ये उन्हाळी सुट्टी जाहीर;
यामध्ये अकोला येथून मंगळवार, १६ जुलै रोजी विशेष एक्स्प्रेस सोडण्यात येणार आहे.
यंदा आषाढ एकादशी १७ जुलै रोजी येत आहे.
त्यामुळे विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी यात्रेकरू प्रवासी मोठ्या संख्येने
पंढरपूरकडे जाणार आहेत.
त्यानुसार, या यात्रेकरू प्रवाशांच्या प्रवासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी
दक्षिणमध्य रेल्वे नांदेड विभागातील नगरसोल, अकोला आणि आदिलाबाद
येथून विशेष गाड्या चालवणार आहे.
दक्षिण मध्य रेल्वेने जारी केलेल्या पत्रकानुसार,
गाडी क्र. ७५५ अकोला-पंढरपूर विशेष मंगळवार, १६ जुलै रोजी अकोला स्थानकावरून
सकाळी ११ वाजता रवाना होऊन बुधवार, १७ जुलै रोजी
पंढरपूर स्थानकावर सकाळी १०:५० वाजता पोहोचणार आहे.
परतीच्या प्रवासात गाडी क्र. ७५६ पंढरपूर-अकोला विशेष
बुधवार, १७ जुलै रोजी पंढरपूर स्थानकावरून रात्री २१:४० वाजता रवाना होऊन
गुरुवार, १८ जुलै रोजी रात्री अकोला स्थानकावर पोहोचणार आहे.
या विशेष गाड्यांमध्ये १ वातानुकूलित, ४, स्लीपर क्लास
आणि १७ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे आहेत.
या विशेष गाडीला दोन्ही दिशेला वाशिम, हिंगोली, बसमत, पूर्णा,
परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, पानगाव, लातूर रोड, उदगीर,
भालकी, बिदर, जाहिराबाद, विकाराबाद, तांदूर, सेरम, चित्तपूर, वाडी,
कलबुरगी, सोलापूर, कुरडूवाडी रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/expensive-cup-of-tata-mahindra-suv/