मुंबई | प्रतिनिधी –
गेल्या काही महिन्यांपासून गगनाला भिडलेल्या सोन्याच्या किमतींमुळे सामान्य ग्राहक हतबल झाले होते.
मात्र, आता सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे.
Related News
जय बजरंग व्यायाम शाळेचा ग्रामीण क्रांतीचा यशस्वी प्रवास!
नुकसान ग्रस्त ठिकाणी आमदार नितीन देशमुख यांची सदिच्छा भेट
बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार
पावसाळ्यामुळे तीन महिन्यांचे रेशन मिळणार….
अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात: टेकऑफनंतर 650 फूटवरच ‘मेडे कॉल’, ATC शी संपर्क अपयशी; ब्लॅक बॉक्स हस्तगत
PM किसान योजनेची २०वी हप्ताची प्रतीक्षा संपणार! २० जूनला येऊ शकतो २००० रुपयांचा हप्ता
प्रवाशी वाहनात माल वाहतूक
मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे आठवडी बाजार मार्केट मध्ये घाणीच साम्राज्य!
अकोल्यात ‘रोड सेफ्टी व्हिजन’ मोहिमेच्या माध्यमातून वाहतूक जनजागृतीला जोर
बोर्डी,रामापूर,शिवपूर,परीसरात गारपिटमुळे हजारो क्षेत्र बाधित
आयाची तत्परता आणि देवाची कृपा,विमान अपघातातून चिमुकली बचावली
हेरिटेज हॉटेलमधील लग्नसोहळ्यात चोरी! – 2 लाख 43 हजारांचा ऐवज लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद
सध्याच्या घडामोडी पाहता, येत्या ४ ते ६ महिन्यांत सोन्याच्या किमतींमध्ये जवळपास १९,००० रुपयांची घट होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
सध्या १० ग्रॅम सोन्याची किंमत १ लाख रुपयांच्या पुढे गेली होती. मात्र अलीकडील घसरणीमुळे ती ७ ते ८ हजार रुपयांनी कमी झाली असून,
येत्या काळात ८०,००० ते ८५,००० रुपयांच्या दरम्यान सोन्याची किंमत स्थिरावू शकते.
जागतिक घडामोडींचा परिणाम
यापूर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात शुल्क वाढवल्यामुळे जागतिक आर्थिक तणाव निर्माण झाला होता,
ज्याचा थेट परिणाम सोन्याच्या किमतींवर झाला आणि त्या झपाट्याने वाढल्या.
मात्र आता जागतिक तणाव कमी होत आहे आणि अमेरिकेच्या धोरणांमध्येही थोडा बदल झाल्याचे दिसत आहे.
परिणामी, गुंतवणूकदारांनी इतर पर्यायांकडे वळायला सुरुवात केल्याने सोन्याच्या किमती घसरणीच्या मार्गावर आहेत.
तज्ज्ञांचे मत काय?
बाजार विश्लेषकांच्या मते, पुढील काही महिन्यांत सोन्याच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे.
जागतिक बाजारात स्थैर्य निर्माण झाल्यास, १० ग्रॅम सोन्याची किंमत ८०,००० रुपयांपर्यंत खाली येऊ शकते.
त्यामुळे सोनं खरेदी करु इच्छिणाऱ्यांसाठी हे योग्य संधीचे क्षण ठरू शकतात.
Read Also : https://ajinkyabharat.com/prem-sangabhaye-chidlelya-pityache-rakshasi-roop/