नवी दिल्ली –
गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरतेमुळे भारतात सोन्याचे दर विक्रमी उंचीवर पोहोचले आहेत.
सध्या 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 93,390 रुपये, तर 22 कॅरेटचा 85,610 रुपये आणि 18 कॅरेटचा 70,050 रुपये इतका आहे.
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
त्यामुळे गुंतवणूकदार, व्यापारी आणि ग्राहक यांच्यात एकच प्रश्न चर्चेत आहे – “सोनं एक लाखांचा टप्पा पार करणार का?”
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा प्रभाव
सोन्याच्या दरवाढीमागे अनेक महत्त्वाचे घटक काम करत आहेत – अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याज दर कपात,
अमेरिका-चीन ट्रेड वॉर, डॉलरची कमजोरी आणि जागतिक अस्थिरता.
स्प्रोट असेट मॅनेजमेंटचे वरिष्ठ पोर्टफोलिओ मॅनेजर रयान मॅकइंटायर यांच्या मते,
“केंद्रीय बँकांकडून होत असलेली सोन्याची मोठी खरेदी आणि आंतरराष्ट्रीय राजकीय तणावामुळे सोन्याच्या दरात स्थिर वाढ होऊ शकते.”
तज्ज्ञांचे वेगवेगळे अंदाज
-
कामा ज्वेलर्सचे एमडी कॉलिन शाह यांनी द हिंदू बिझनेस लाईनला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “सध्याच्या परिस्थितीत सोनं लवकरच 1 लाखांचा टप्पा पार करेल.”
-
दुसरीकडे, मोतीलाल ओसवालचे कमोडिटी हेड किशोर नारने यांनीही आंतरराष्ट्रीय दर 4000 ते 4500 डॉलर प्रति औंसपर्यंत जाऊ शकतात असे भाकीत वर्तवले.
-
मात्र, अबास फायनान्शिअल सर्व्हिसेसचे सीईओ चिंतन मेहता आणि मॉर्निंग स्टारचे रणनीतीकार जॉन मिल्स
यांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे. मिल्स यांच्या मते, “सोने 1820 डॉलर प्रति औंसवर येऊ शकते, म्हणजेच मोठी घसरण होऊ शकते.”
गुंतवणूकदारांसाठी काय योग्य?
गुंतवणूकदारांनी थेट मोठी गुंतवणूक करण्याआधी बाजारातील स्थिती, जागतिक घडामोडी
आणि तज्ज्ञांचे विश्लेषण समजून घेणे आवश्यक आहे.
सध्याचा कालावधी हा “उच्च दरावर विक्री आणि सुधारणा आल्यावर पुन्हा गुंतवणूक”
अशा धोरणासाठी योग्य ठरू शकतो.
Read Also : https://ajinkyabharat.com/jagaav-polis-thayanatil-don-hawaldar-lach-ghetana-attake-gunha-praid/