अकोला –
एका वयोवृद्ध व्यक्तीची बॅग बळजबरीने हिसकावून पळून गेलेल्या अनोळखी आरोपींच्या मुसक्या आवळण्यात
अकोला पोलिसांना अवघ्या २४ तासांत यश आलं आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडवली होती,
Related News
जय श्रीराम जय गोमाता | गोवंश तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला
मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीलाच अपमान कारक वागणूक
मूर्तिजापूर इंटरनॅशनल स्कूलमध्ये बाल वारकऱ्यांची दिंडी, रिंगण सोहळ्याने भाविक मंत्रमुग्ध
आषाढी एकादशी विशेष बातमी | अकोला ३२० वर्षांच्या परंपरेचे साक्षीदार विठ्ठल मंदिरात पहाटे महापूजा | ९२ वर्षांची अखंड हरिनाम परंपरा
बिहारमधील मतदार यादी पुनरिक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; ADRची याचिका
वारंवार तक्रार करूनही गटविकास अधिकारी यांची कारवाई करण्यास टाळटाळ
अकोला : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; ऑटोचालकाने घेतला हाताला आणि दंडाला चावा – आरोपीला अटक
अकोट | नऊ वर्षांच्या मुलाचा अमानुष खून – आईच्या जिवलगावरून जीव घेतला!
कापशी रस्त्यावरील अपूर्ण सर्विस रोड जीवघेणा ठरत आहे!
धामणा बुद्रुकमध्ये कॉलराचा उद्रेक; एका नागरिकाचा मृत्यू, गावात भीतीचं वातावरण
रिधोरा : नाग प्रजातीचा विषारी साप घरात आढळला;
पिंपळखुटा येथील चोरी गेलेले गोवंश पोलिसांनी पकडले
मात्र पोलिसांच्या जलद आणि अचूक कारवाईमुळे गुन्हा उघडकीस येऊन, संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रात्री मोटारसायकलवरून घरी जात असताना दोन
अनोळखी व्यक्तींनी त्यांची वाट अडवली. आरोपींनी विरुद्ध दिशेने येत फिर्यादीला रोखलं
आणि त्यांच्या जवळची बॅग हिसकावली. या बॅगमध्ये रु. १३,५०० रोख रक्कम आणि १०० अमेरिकन डॉलर्सच्या नोटा होत्या.
बॅग हिसकावल्यानंतर आरोपी तातडीने मोटारसायकलवरून पळून गेले.
घटनेनंतर अकोला पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज,
तांत्रिक माहिती व गोपनीय सूत्रांच्या आधारे अवघ्या २४ तासांत पोलिसांनी ३ आरोपींना ताब्यात घेतलं.
गुन्ह्यातील संपूर्ण मुद्देमाल, अंदाजे १.५ लाख रुपये, हस्तगत करण्यात आले आहेत.
पोलीस दलाचं कौतुक
या प्रकरणात पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि अचूकता यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून,
वयोवृद्धांसाठी अधिक सुरक्षितता पुरवण्याची मागणीही आता अधिक तीव्र झाली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/sonam-1-lakh-cross-karanar/