अकोला-बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवरील सोनाळा पोलिस ठाणे हद्दीतील सुप्रसिद्ध वारी भैरवगड येथील समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या
हनुमान मंदिरातून अज्ञात चोरट्यांनी साडेपाच किलो वजनाचे दागिने व दान पेटीतील ७० हजारांची रोकड लंपास केली.
चोरट्यांनी मंदिराचे मुख्य द्वाराचे कुलूप तोडून प्रवेश केला. त्यांनी हनुमान आणि गणेश मूर्तीवरील सुमारे ५ किलो ४५० ग्रॅम चांदीचे दागिने चोरले.
Related News
दानपेटी फोडून ७० हजारांची रोकड घेऊन पसार झाले. यात सुमारे ३ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याने खळबळ उडाली.
मंदिरात सीसी कॅमेरे नसल्याने चोरट्यांची ओळख पटविणे पोलिसांसाठी आव्हान बनले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/district-magistrate-ajit-kumbhar-implemented-the-e-office-system-in-full-capacity/

