साठ वर्षीय महिलेची सोनसाखळी हिसकावून चोरटा फरार

साठ वर्षीय महिलेची सोनसाखळी हिसकावून चोरटा फरार
 अकोला : शहरातील जठारपेठ भागात एका 60 वर्षीय महिलेची 15 ग्राम  सोनसाखळी अज्ञात मोटर सायकल स्वाराने लंपास केल्याची घटना आज सकाळी घडली.
महिला मंदिरातून दर्शन घेऊन घरी परत येत असताना मोटरसायकल स्वाराने महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून घेतली.
चोरट्याने साखळी हिसकावून नंतर पळ काढला आणि काही अंतरावर हा चोरटा वेगात गाडी चालवत असतानाचा व्हिडिओ सीसीटिव्ही कैद झाला आहे..
रामदास पेठ पोलिसांनी यासंदर्भात गुन्हा दाखल केला असून चोरट्याचा शोध सुरू आहे.
सकाळी फिरायला जाताना मौल्यवान वस्तू घालून न जाण्याचे आवाहन अकोला पोलिसांनी केले आहे.

Related News