सिरसो गायरानातील आदिवासी फासेपारधी समाज विकासापासून वंचित

उपविभागीय

उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू

प्रशासन दखल घेईल का ?

मूर्तिजापूर येथे उपविभागीय कार्यालयाच्या आवारासमोर

Related News

सिरसो गायरानातील आदिवासी भटके फासेपारधी समाजाने

२५ जून २०२४ रोजी उपोषणाला सुरुवात केली आहे.

गेल्या १० ते १५ वर्षापासून उपोषणकर्ते

सिरसो गायरान येथे रहिवासी आहेत.

आमच्या दोन पिढ्या या ठिकाणी वास्तव्य करीत आहेत;

मात्र आम्हाला आजपर्यंत घरबांधणीसाठी

व शासनाच्या अनेक योजनांकरिता ग्रामपंचायतीने

नमुना ८ अ आजपर्यंत न दिल्याने

आम्ही शासनाच्या सोयी सवलतीपासून गेल्या अनेक वर्षापासून वंचित आहोत.

आम्ही स्वतः टीनपत्रे व कुडाची घरे बांधून वास्तव्य करीत आहे,

अनेक वेळा अर्ज, विनंती, निवेदन ग्रामपंचायतपासून तहसीलदार,

उपविभागीय अधिकारी, आमदार व इतर लोकप्रतिनिधी यांना दिले;

मात्र आमच्या नागरी सुविधांकडे अनेक वर्षापासून दुर्लक्ष केल्या जात आहे,

आमची गॅरंटी या देशात कोणीच घ्यायला तयार नाही का?

आम्ही भारताचे नागरिक नाही का ? आमच्या वस्तीत रात्रीचे विजेचे दिवे नाहीत,

पिण्याच्या पाण्याची समस्या, रस्त्यांची समस्या,

नाल्यांची समस्या असून आम्ही आरोग्याच्या सुविधा पासून आणि

विकासापासून कोसो दूर असलेला आदिवासी भटका समाज

२५ जून २०२४ पासून आमरण उपोषणाला बसलेला आहे,

यांच्या प्रश्नाची जाण शासनालाही नाही व लोकप्रतिनिधी यांनाही नाही

त्यांच्या विविध मागणीसाठी ह्या आदिवासी समाजाचे २० ते २५ नागरिक

स्त्रियांसह मुलाबाळांसह आमरण उपोषण करीत आहे

याची दखल लवकरात लवकर घेण्यात यावी,

अशी मागणी उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर

तसेच आदिवासी प्रकल्प अधिकारी अकोला व

मुख्यकार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद अकोला यांना

लेखी निवेदन देऊन उपोषणाला बसले आहेत.

सिरसो गायरान येथील ही लोकं आपल्या न्याय हक्कासाठी उपोषण करीत आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/tree-plantation-by-gyan-narmada-on-the-occasion-of-rajshree-shahu-maharajs-birth-anniversary/

Related News