छत्रपती संभाजीनगरमध्ये सातवीतील विद्यार्थिनीला नशेचे औषध पाजून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी मागितल्याप्रकरणी दोन आरोपींना अटक.विद्यार्थिनी
छत्रपती संभाजीनगर : शहरातून मानवतेला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. सातवीत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला नशेचे औषध पाजून तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी पीडितेचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ तयार करून ते व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी मागितल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी यांची पूर्वीपासून ओळख होती. या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपींनी मुलीला एका ठिकाणी नेले. तेथे तिला नशेचे औषध दिल्यानंतर ती बेशुद्ध झाली. त्यानंतर आरोपींनी तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Related News
EPFO Enrolment Campaign 2026 : नोकरीला 17 वर्षे पूर्ण झाली? मग ही संधी सोडू नका; PF सोबत पेन्शन आणि विम्याचाही लाभ
EPFO Enrolment Cam...
Continue reading
जनधन योजनेबाबत धक्कादायक माहिती; 5.72 कोटी खात्यांमध्ये शून्य शिल्लक
प्रत्येक चौथ्या जनधन खात्यापैकी एक खाते निष्क्रिय; आरटीआयमधून समोर आली आकडेवारी, महाराष्ट्रातील 36.04 लाख खात्...
Continue reading
Pakistan सौदीच्या मदतीला युद्धात उतरणार? मक्का करारामुळे मध्यपूर्वेत नवा तणाव
Pakistan Mecca Pact : मध्यपूर्वेतील संघर्षाच्या पार्श्वभूमी...
Continue reading
DJ मुळे मंत्र्यालाच ऐकू येणे कमी; गुलाबराव पाटलांचा धक्कादायक अनुभव, गणेशोत्सवात डीजे न वाजवण्याचे आवाहन
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात डीजेच्या मोठ्या आवाजाचा मुद्दा पुन्...
Continue reading
इंजिनिअर हरले, तंत्रज्ञानही फेल! 170 वर्षे जुनी खडे हनुमानाची मूर्ती एक इंचही हलली नाही; उज्जैनमध्ये नेमकं काय घडलं?
सिंहस्थ महाकुंभ 2028
Continue reading
Sugar Rate : साखरेच्या दरात मोठी घसरण; केंद्राच्या १० लाख टन आयात निर्णयासमोर नवा पेच
देशांतर्गत बाजारात साखरेच्या दरात झालेल्या मोठ्या घसरणीचा परिणाम आता केंद्र सरकारच्या साखर आय...
Continue reading
मनुस्मृतीचं दहन, जोरदार घोषणाबाजी; युवक काँग्रेसची संघ कार्यालयावर धडक, नागपुरात वातावरण तापलं
मनुस्मृतीचं दहन, घोषणांनी न...
Continue reading
“तुम्ही आडवे या, मराठ्यांना एक जरी काठी लागली तर...” Manoj Jarange Patil चा निर्वाणीचा इशारा; अंतरवालीत वातावरण तापलं
मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच तापला असून, मराठा ...
Continue reading
संभाजीनगरात बसून दंगल घडवण्याचं षडयंत्र; काही झालं तर एकनाथ शिंदे जबाबदार – Manoj Jarange Patil
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. मराठ...
Continue reading
“तुमच्याने होत नसेल तर, माझ्या पैशांनी बोर्ड लावते”; Vandana Gupte संतापल्या, नवी मुंबई विमानतळाचा व्हिडीओ चर्चेत
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावरील दिशादर्श...
Continue reading
गणेशोत्सवाआधी DJ चा वाद टोकाला; श्रेयस तळपदे म्हणाले, “सण साजरे करा, पण लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या”
DJ वादावर श्रेयस तळपदे स्पष्टच बोलले : र...
Continue reading
Vijay Thalapathyयांचे सरकार पडणार? तमिळनाडूत मोठ्या राजकीय घडामोडी; विरोधक एकवटणार?
Vijay Thalapathy : तमिळनाडूच्या राजकारणात सध्या मोठ्या रा...
Continue reading
तपासादरम्यान आरोपींनी पीडितेचे फोटो आणि व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केल्याचे समोर आले. त्यानंतर संबंधित सामग्री कुटुंबीयांना पाठवून ती सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देण्यात आली. तसेच बदनामीची भीती दाखवत पैशांची मागणी केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेनंतर पीडितेच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला. त्यानंतर टीव्ही सेंटर परिसरातील एका बारमधून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
घटना उस्मानपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने आरोपींना पुढील तपासासाठी उस्मानपुरा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या प्रकरणी पोक्सो कायदा, अत्याचार, खंडणी आणि इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
read also : https://ajinkyabharat.com/ind-a-vs-afg-a-22-runs-44-runs-blast-vaibhav-suryavanshi-dangerous-game-against-afg-afg-a-baby-boss-trailer/