शिवपूर-कासोदमध्ये वीज पडून बैलजोडी ठार; शेतकऱ्याचे ६० हजारांचे नुकसान

शेतकऱ्याचे ६० हजारांचे नुकसान

अकोट तालुका

सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या शिवपूर-कासोद शेतशिवारात आज दुपारी वादळी वारा

आणि पावसादरम्यान अचानक वीज कोसळून शेतकरी लक्ष्मण शालिकराम गुरेकार यांच्या बैलजोडीचा मृत्यू

झाल्याची दुर्दैवी घटना घडली. वीज निंबाच्या झाडावर पडल्याने, झाडाला बांधलेली बैलजोडी जागीच ठार झाली.

या दुर्घटनेत शेतकऱ्यांचे अंदाजे ५० ते ६० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

अल्पभूधारक शेतकऱ्याची हृदयद्रावक अवस्था

लक्ष्मण गुरेकार हे केवळ दोन एकर शेती असलेले अल्पभूधारक शेतकरी असून,

त्यांचं मुख्य उपजीविकेचं साधन हीच बैलजोडी होती.

ती भाड्याने देणे, स्वतः नांगरणी करणे व अन्य मजुरी करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.

अशा वेळी अचानक झालेल्या या घटनेमुळे गुरेकार कुटुंब हवालदिल झाले आहे.

पंचनामा व मदतीची मागणी

घटनेची माहिती मिळताच तलाठी राजाभाऊ खामकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली

व पंचनामा तयार करण्यात आला. त्यांनी सांगितले की, “घटनेचा अहवाल लवकरच अकोट तहसीलदार

कार्यालयाकडे सादर केला जाणार आहे.” शेतकऱ्यांनी शासनाकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे.

Read Also :https://ajinkyabharat.com/24-tasant-jabri-chorcha-bushfash-akola-polesanchi-excellent-kamagiri/