शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)ची मागणी

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)ची मागणी

अकोट तहसीलदारांना निवेदन सादर; सरकारच्या आश्वासनाची आठवण करून दिली

अकोट (प्रतिनिधी)

अकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट)

यांच्यावतीने तालुकाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. पक्षाचे तालुकाध्यक्ष

Related News

श्रीयश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले असून शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले.

निवडणुकीत आश्वासने, प्रत्यक्षात शून्य कर्जमाफी!

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचे आश्वासन दिले होते.

मात्र, निवडणुका जिंकल्यानंतर हे आश्वासन हवेत विरले असून प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झाली नाही,

अशी टीका निवेदनात करण्यात आली आहे.

तसेच मार्च महिन्याच्या अखेरीस बँकांकडून कर्जफेडीचा दबाव टाकण्यात येत

असल्यामुळे शेतकरी अजूनच अडचणीत सापडले आहेत, असेही नमूद करण्यात आले.

नुकसानीने गांजलेला शेतकरी आत्महत्या करण्याच्या उंबरठ्यावर

निरंतर नापिकी, शेतमालाला मिळणारा कवडीमोल दर, वाढते उत्पादन खर्च आणि बँकांचे दडपण यामुळे

शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या

अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे निर्णय घेतले आहेत.

“शेतकरी आत्महत्येस सरकार जबाबदार असून, अशा प्रकरणांमध्ये खुनाचे गुन्हे दाखल करावेत,”

अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांसाठी कायद्याने सरसकट कर्जमाफीची अंमलबजावणी करा – राष्ट्रवादी काँग्रेस

शेतकरी विरोधी धोरणांमुळे ग्रामीण भागात आर्थिक व सामाजिक असंतुलन निर्माण झाले आहे.

त्यामुळे शासनाने तातडीने सरसकट कर्जमाफी जाहीर करून दिलेल्या निवडणुकीतील आश्वासनांची पूर्तता करावी,

अशी ठाम मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.

निवेदन सादर करताना उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते:

या निवेदनप्रसंगी जिल्हा बुथ कमिटी प्रमुख कैलास गोंडचर, तालुकाध्यक्ष श्रीयश चौधरी, सिकंदर मर्दाने,

माजी नगरसेवक विवेक बोचे, कृ.उ.बा.सं. संचालक धीरज हिंगणकर, तसेच अविनाश जायले,

अंकुश चौधरी, रोशन कंकाळे, आश्विन चौधरी, राम देशमुख, हनुमंत चौधरी, मंगळे, अब्रक शेख,

अजीत शेख, अलीम शहा, आकाश चव्हाण, योगेश इंगोले, प्रमोद लहाने, गजानन पडोळे,

कैलास कोटकर, नरेंद्र कोंडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Related News