अकोट (प्रतिनिधी):
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि माजी आमदार रामाभाऊ कराळे यांच्या प्रेरणेतून आणि शिवसेना
पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हिंदुत्ववादी विचारांनी प्रेरित होऊन अकोला जिल्ह्यातील अकोट
Related News
सीकर कृषी मंडीत भीषण आग;
हनुमान जयंतीनिमित्त भव्य धार्मिक आयोजन – भक्तांनी घेतला आनंद
पातूर येथे उत्साहात गुरु-शिष्य जयंती साजरी
दिल्ली विमानतळावर तात्पुरता बदल: T2 टर्मिनल बंद,
श्रीनगर – अमरनाथ यात्रा 2025 साठी नोंदणी प्रक्रियेची सुरुवात झाली आहे…
अंबेडकर जयंती शोभायात्रा दरम्यान युवतीसोबत छेडछाड;
आर्थिक सुबत्ता असेल तरच इतरांशी स्पर्धा करू शकतो : डॉ सुगत वाघमारे
“ब्लू ओरिजिन”ने रचला इतिहास; केटी पेरीसह ६ महिलांचा यशस्वी अंतराळ प्रवास
वाराणसी सामूहिक बलात्कार प्रकरण : डीसीपी चंद्रकांत मीणा हटवले; पंतप्रधान मोदी नाराज
खामगाव-नांदुरा रोडवर भीषण अपघात: बस आणि ट्रकची समोरासमोर धडक; ३ ठार, २० जण गंभीर जखमी
अकोला शहरात सार्वजनिक भीम जयंती समितीतर्फे रॅलीचे भव्य आयोजन; निळ्या भीमसागराची उसळ
अकोल्यात काँग्रेस आणि वंचित कार्यकर्त्यांमध्ये वाद;
विधानसभा मतदारसंघातील शेकडो तरुणांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश केला.
हा भव्य पक्षप्रवेश सोहळा अकोट शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील स्मारक येथे पार पडला.
या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर, पश्चिम विदर्भ निरीक्षक राहुल कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली,
उपजिल्हा प्रमुख मनीष रामाभाऊ कराळे यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश संपन्न झाला.
कार्यक्रमास निवासी उपजिल्हा प्रमुख संतोष अनासने, जिल्हा सचिव सतीश गोपनारायण,
शहर संघटक राजेश पिंजरकर, तसेच तालुकाप्रमुख प्रकाश गीते, शहरप्रमुख मनीष राऊत,
युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख विशाल चौधरी, शहरप्रमुख आनंद शिवरकर आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मधील अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिंदे गटात प्रवेश केला.
त्यात सरपंच, उपसरपंच, युवा सेनेचे पदाधिकारी, शाखा प्रमुख, सर्कल प्रमुख, तसेच अनेक तरुणांचा समावेश होता.
नवीन कार्यकर्त्यांनी भगवा दुपट्टा स्वीकारत शिवसेनेच्या हिंदुत्ववादी विचारसरणीशी
एकनिष्ठ राहून प्रामाणिकपणे काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.
या सोहळ्यामुळे अकोट तालुक्यातील शिवसेना पक्ष अधिक बळकट झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
शिवसैनिक, युवासैनिक आणि समर्थक मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.