बांगलादेश सोडून शेख हसीना आल्या भारतात!

बांगलादेशच्या

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत

आपल्याच देशातून पलायन केलं आहे. हसीना शेख यांच्या पंतप्रधान निवासात

काल काही आंदोलकांनी प्रवेश करत तोडफोड केली.

Related News

परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे हसीना शेख यांना अखेर काल देश सोडावा लागला.

शेख हसीना आपल्या विशेष हेलिकॉप्टरने भारताच्या दिशेला रवाना झाल्या.

शेख हसीना यांच्यावर ओढावलेल्या या संकट काळात भारताने त्याने आश्रय दिला आहे.

त्यांचं हेलिकॉप्टर बांगलादेश येथून निघाल्यानंतर भारताच्या उत्तर प्रदेशमधील

हिंडन एअरबसवर लँड झालं. त्या भारतात फार वेळ थांबणार नाहीत.

त्या लवकरच युरोपच्या दिशेला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

शेख हसीना या लंडनला जाण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख हसीना यांनी पुढचा निर्णय घेतलेला नाही.

त्यांनी भारताकडून अजून कोणत्याही प्रकारची मदत मागितलेली नाही.

त्यांनी कोणत्याही प्रकारची मदत मागितली तर भारत सरकार त्यावर विचार करेल.

बांगलादेशमधील परिस्थितीवर भारत अलर्ट मोडवर आहे.

विशेष म्हणजे ईशान्य भारतातील राज्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/death-toll-in-keralas-wayanad-reaches-402/

Related News