शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत

अकोट

अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी अति दुर्गम १ आदिवाशी भागातील ग्राम पोपटखेड

येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथ मराठी शाळेत शाळा प्रवेशोत्सव २०२५,२६ मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.

Related News

यावेळी वर्ग १ लीमध्ये दाखल झालेल्या नवगत विद्यार्थ्याचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.या निमित्ताने गावातून बैलबंडीने वाजत गाजत प्रवेश दिंडी काढण्यात आली.

यावेळी प्रथम पाऊल’म्हणून विद्यार्थाचे पाऊलांचे ठसे घेण्यात आले.यावेळी गावातील प्रथम नागरीक मा.विजेंद्र तायडे,

शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ.रिना भास्कर,उपाध्यक्ष राजेंद्र मोरे,तथा सर्व सदस्य उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक वाटप,गणवेश वाटप,बुट वाटप करण्यात आले.त्याच बरोबर शालेय पोषण आहारात गोड भाताचे वाटप करण्यात आले.

शाळा प्रवेशोत्सवाला गजानन सावरकर शिक्षण विस्तार अधिकारी पं.स अकोट यांनी भेट देवून विद्यार्थाचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.

शाळा प्रवेशोत्सव २०२५-२६ मोठ्या उत्साहात व थाटामाटात साजरा झाल्याने विद्यार्थ्यांच्या मनात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक,व गावकरी मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

शाळेचे मुख्याध्यापक संजय साळुंके तसेच सर्व शिक्षक,शिक्षिका,कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Read Also : https://ajinkyabharat.com/akola-mahamargawar-bashankanchi-todfod-open-open-barsadhik-situated-citizen-sent/

 

Related News