गुजरातमध्ये पावसाचे थैमान; सात जण गेले वाहून

गुजरातमध्ये

गुजरातमध्ये पावसामुळे थैमान घातले आहे. जनजीवन विस्कळीत

झाले आहे. दरम्यान, मोरबी जिह्यात नदी पार करताना ट्रॅक्टर-ट्रॉली

वाहून गेल्याने सात जण बेपत्ता आहेत. NDRF टीमकडून शोधमोहिम

Related News

सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून गुजरातमध्ये मुसळधार ते

अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. गुजरातमधील काही भागात पूर परिस्थिती

निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील शेकडो रहिवाशांनी सुरक्षित ठिकाणी

स्थलांतरित केले आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने (IMD) सोमवारी

इशारा दिला की गुजरातमध्ये पुढील 2-3 दिवसांत मुसळधार ते अत्यंत

मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता आहे. त्यामुळे गुजरातमध्ये परिस्थिती

आणखी गंभीर होऊ शकते असा अंदाज देखील वर्तवण्यात येत आहे,

गुजरातमधील मुसळधार पावसामुळे राज्यातील सर्व प्राथमिक शाळांना

उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्याचे शिक्षणमंत्री प्रफुल्ल पानशेरिया

यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे. या संदर्भातील वृत्त त्यांनी प्रसारमध्यमांना दिले आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/mpsc-agricultural-service-exam-route-for-258-posts-mokala/

Related News