अकोट : तालुक्यातील गट ग्रामपंचायत सावरगाव येथे प्रभाग क्रमांक 1 व 3 मधील नागरिक मूलभूत समस्यांनी त्रस्त झाले आहेत.
सध्या स्थितीमध्ये पावसाळ्याचे दिवस असून, पावसाचे पाणी व सांडपाणी नाल्यांच्या माध्यमातून गावा बाहेर काढण्यासाठी नाल्यांची व्यवस्था ग्रामपंचायत ने केलेली नाही.
एक साईड ने नाली केलेली आहे व दुसऱ्या साईडने अद्यापही दुसरी नाली तयार केली नसून
Related News
नागरिकांच्या घरातील सांडपाणी रोडवरच पसरल्या जात आहे.
या सर्व प्रकारामुळे रोडवरच पाणी पसरले आहे.
रोडवर पाणी साचल्यामुळे नागरिकांना ये जा करण्यासाठी प्रचंड मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
साचलेल्या सांडपाण्यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.
या सर्व प्रकारामुळे ज्या नागरिकांच्या घरासमोर सांडपाणी साचलेले आहे तेथील लोक गाव सोडून दुसऱ्या गावी राहण्यासाठी गेले आहेत.
यामुळे सर्वत्र गावांमध्ये एकच चर्चा पसरली आहे.
साचलेल्या सांडपाण्याला कंटाळून गाव सोडून जाणे ही अतिशय दुर्दैवी व गंभीर बाब आहे.
ग्रामपंचायतला अनेक वेळा समस्या मांडल्या तक्रारी केल्या,मात्र गट ग्रामपंचायत सावरगाव ने कुठल्याच प्रकारची कार्यवाही केली .
नसल्याने ग्रामपंचायतच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
साचलेल्या सांडपाण्याची विल्हेवाट लवकरात लवकर ग्रामपंचायतने न केल्यास तीव्र आंदोलनाचा
इशारा गट ग्रामपंचायत सावरगाव येथील प्रभाग क्रमांक 1 व 3 ग्रामस्थांनी दिला आहे.
प्रतिक्रिया
गेल्या दोन ते तीन वर्षापासून ग्रामपंचायत ने प्रभाग क्रमांक एक मध्ये पावसाळ्यातील पाणी व सांडपाणी नाल्यांच्या
माध्यमातून बाहेर काढण्याकरिता कुठलीच कार्यवाही केली नसून, आम्ही या पाण्यातून ये जा करत असल्यामुळे आम्हाला फार प्रचंड त्रास होत आहे.
मुलांना शाळेत जाण्याकरिता सुद्धा त्रास होत आहे. काही नागरिक या सततच्या त्रासामुळे गाव सोडून दुसऱ्या गावी गेले आहेत.
सरपंच व सचिवांना या संदर्भात विचारले असता वर्गणी गोळा करून काम करा असे आम्हाला सांगतात.
अनिल नारे
माजी उपसरपंच, सावरगाव
प्रतिक्रिया
पावसाळ्यातील पाणी व सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याकरिता ग्रामपंचायतला निधी उपलब्ध नाही.
ग्रामस्थांना सांडपाण्याचा त्रास असल्यास सर्वांनी वर्गणी गोळा करून काम करता येईल. व त्यांची समस्या सुटेल.
एस. डी.मंगलकर
ग्रामसचिव, गट ग्रामपंचायत सावरगाव
Read Also : https://ajinkyabharat.com/motha-reveal-crush-jhaleli-aircraft-is-half-baked-signs/
