Santosh Deshmukh Murder Case: विशेष सरकारी वकील अॅडवोकेट उज्वल निकम यांनी
न्यायालयात संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला.
Santosh Deshmukh Murder Case: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या
Related News
प्रकरणात नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. सर्व आरोपी सध्या पोलीस कोठडीत
असून हे प्रकरणाची कोर्टात सुनावणी सुरू आहे. सुनावणीदरम्यान विशेष सरकारी वकील उज्वल
निकम यांनी न्यायालयात युक्तीवाद केला आहे. त्यातून एक महत्त्वाची बाब समोर आली आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींचे कबुलीजबाब घेण्यात आले. हे सर्व जबाब गोपनीय आहेत.
मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदर्शन घुलेला अटक केल्यानंतर त्याने पोलीस कोठडीत संतोष देशमुख यांचे
अपहरण करून खून केल्याची कबुली दिल्याचं मान्य केल आहे.
घुलेसह जयराम चाटे, महेश केदार यांनी देखील जबाब दिले आहेत.
यावेळी त्यांनीदेखील हत्येची कबुली दिल्याचे म्हटलं आहे. तर सुदर्शन घुले हाच या टोळीचा
प्रमुख असल्याचं सांगण्यात आलं आहे. विशेष सरकारी वकील
उज्वल निकम यांनी न्यायालयातही असाच युक्तिवाद केला आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणाची बुधवारी बीडच्या विशेष हत्या मकोका न्यायालयात सुनावणी झाली.
यावेळी विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी ३२ मिनिटांत खंडणी ते हत्या हा घटनाक्रम मांडला.
तसेच सीसीटीव्ही फुटेज, सीडीआर, टॉवर लोकेशन, ऑडिओ-व्हिडीओ रेकॉर्डिंग असे पुरावे असल्याचे सांगितले.
हेच पुरावे आम्हाला देण्यात यावेत, अशी विनंती आरोपींच्या वकिलांनी अर्ज करून केली.
आता पुढील सुनावणी 10 एप्रिल रोजी होणार आहे. 9 डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुख यांची हत्या झाली होती.
या प्रकरणात वाल्मीक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुलेसह आठ आरोपी आहेत. यातील कृष्णा आंधळे हा फरार आहे.
केज न्यायालयात सुनावणी झाली. परंतु, सुरक्षेचे कारण देत सीआयडीने हे प्रकरण
बीड न्यायालयात चालवावे, अशी विनंती केली होती.
त्याप्रमाणे बुधवारी पहिली सुनावणी बीडच्या न्यायालयात पार पडली.
उज्वल निकम यांचा युक्तीवाद काय?
8 डिसेंबर रोजी हॉटेल तिरंगा नांदुर फाटा येथे विष्णू चाटे सुदर्शन घुले यांची बैठक झाली.
संतोष देशमुख खंडणी प्रकरणात अडवे येत आहेत. अस विष्णू चाटे म्हणाले.
त्यावेळी कायमचा धडा शिकवा अस सांगितलं. या संपुर्ण घटनेला वाल्मीक कराड याने गाईड केले.
तस cdr मधुन समोर आलय. फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे यांनी वाल्मीक कराड
आणि विष्णू चाटे या दोघांना तिन वेळा फोन केला. सुरवातीला आवादा कंपणीच्या वॉचमेनला
सुदर्शन घुले यांनी मारहाण केली, असा युक्तीवाद उज्वल निकम यांनी केला.