Kunal Kamra Gets Huge Donations: कुणाल कामरा वादात सापडाला असला तरी जगभरातून
त्याच्या खात्यावर पैसे पाठवले जात असल्याची माहिती समोर येत आहे.
Kunal Kamra Gets Huge Donations:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्षपणे टीका
Related News
आलेगाव बाभुळगाव रस्ता बनला अपघाताचा
रेल्वे स्थानकावर निंबाच्या झाडाची फांदी तुटली, वन्यजीव सेवेमुळे वाचले साठ बगळे!
महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी
मुर्तिजापूर बसस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ, ओळख अद्यापही गूढ!
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
WCL मध्ये नोकरीचं आमिष दाखवून अकोल्यातील २५ बेरोजगारांची अडीच कोटींची फसवणूक; माजी आमदाराच्या नावाने धमकीचा आरोप
ठाकरेंना दुबेंचं थेट आव्हान : “हिम्मत असेल तर बिहारमध्ये या!”
अकोट खरेदी-विक्री संघ ज्वारी खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून गुन्हे दाखल करा
ग्रामीण भागातील पांदन रस्त्याची अवस्था बिकट
शेत रस्त्याचे रूपांतर तलावात : शेतकरी हतबल
पंढरीत विठ्ठल भक्तांचा महापूर
केल्याने स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे.
कुणाल कामरा विरोधात शिवसेनेच्या वतीने मनमाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यामध्ये कलम 353 (b) 1 म्हणजेच, सोशल मीडियावर खोटी बातमी पसरवणे व समाजात अशांती पसरवणे,
कलम 352 (2) दोन गटांमध्ये वैर निर्माण करणे तथा शांतता भंग करणे, 356 (2)
प्रतिष्ठत व्यक्तीची बदनामी करणे अशी कलम लावण्यात आली आहेत.
हे गुन्हे न्यायालयात सिद्ध झाल्यास आर्थिक दंड व साधा कारावास शिक्षेची
तरतूद असल्याने कुणालच्या अडचणी वाढू शकतात अशी चर्चा आहे.
मात्र असं असतानाच दुसरीकडे कुणाल कामरासाठी आता त्याचे समर्थक
पुढे सरसावले असून त्याला कोट्यवधी रुपयांची आर्थिक मदत मागील काही दिवसांमध्ये मिळाली आहे.
कोट्यावधी रुपयांची मदत
कुणाल कामराला देशविदेशातून वाढता पाठिंबा मिळताना दिसत आहे.
एकीकडे कुणाल कामरावर माफीसाठी दबाव टाकला जात आहे.
याचवेळी कुणालच्या कायदेशीर लढ्यासाठी जगभरातून आर्थिक मदतीचा ओघ सुरू झाला
असून दोन दिवसांत त्याच्या खात्यात तब्बल चार कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा झाली आहे.
कुणालने महाराष्ट्रातील फोडाफोडीच्या राजकारणावर भाष्य केले, अशी उत्स्फूर्त
प्रतिक्रिया महाराष्ट्र- भारतासह इतर देशांतील चाहतेही व्यक्त करीत आहेत. याचवेळी
कुणालचा कायदेशीर लढा बळकट करण्यासाठी जगभरातील चाहत्यांकडून
आर्थिक मदतीचा तुफान ओघ सुरू झाला आहे. या मदतीच्या रूपात दोन दिवसांत
कुणालच्या खात्यात तब्बल 4 कोटी 7 लाख 80 हजार रुपये जमा झाल्याची माहिती समोर आली आहे.