Saif Ali Khan Attack Case: 16 हजार पानी आरोपपत्रात गंभीर खुलासे; करीना कपूरचा पोलिसांना सविस्तर जबाब

Saif Ali Khan Attack Case: 16 हजार पानी आरोपपत्रात गंभीर खुलासे; करीना कपूरचा पोलिसांना सविस्तर जबाब

मुंबई: अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणात पोलिसांनी न्यायालयात १६,००० पानी

आरोपपत्र दाखल केले असून, त्यातून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.

या आरोपपत्रात सैफच्या पत्नी करीना कपूर हिने दिलेला सविस्तर जबाबही समाविष्ट आहे.

Related News

करीनाने पोलिसांना सांगितले की, हल्ल्यानंतर तिने सैफला सर्व काही बाजूला ठेवून तातडीने

रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. सैफच्या मानेवर, पाठीवर आणि हातावर जखमा झाल्या होत्या.

करीना कपूरच्या जबाबानुसार, हल्ला घडल्यानंतर तिने तातडीने

घरातील नोकरांना बोलावून हल्लेखोराचा शोध घेतला, मात्र तो मिळून आला नाही.

त्यानंतर घर सुरक्षित नसल्याची जाणीव होताच, करीनाने सर्व कर्मचाऱ्यांना खाली येण्यास सांगितले

आणि सैफला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी हरी नावाच्या नोकराला जबाबदारी सोपवली.

तैमूरनेही वडिलांसोबत जाण्याचा आग्रह धरल्याने करीनाने त्याला सैफ आणि हरीसोबत लीलावती रुग्णालयात पाठवले.

करीनाने दिलेल्या माहितीनुसार, ती वांद्रे पश्चिम येथील सतगुरु शरण बिल्डिंगमध्ये सैफ

आणि मुलांसह राहते. त्यांच्या अपार्टमेंटमध्ये तीन मजल्यांचा विस्तार आहे—११ वा मजला

(बेडरूम), १२ वा मजला (लिव्हिंग एरिया), आणि १३ वा मजला (नोकरांसाठी क्वार्टर व लायब्ररी).

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपी शरीफुल इस्लाम हा २५ वेगवेगळ्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असून,

त्याच्या ओळखीची खात्री झाली आहे. हल्ल्याचे नेमके कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Related News