मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य सरकारच्या
वतीने 14 व 15 एप्रिल 2025 रोजी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किट’ या विशेष
मोफत सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा उद्देश
Related News
सततच्या पावसामुळे तीन वेळा पेरणी वाया; शेतकऱ्यांचा आक्रोश, नुकसानभरपाईची मागणी
देवरीफाटा परिसरात दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक;
कोकणात मुसळधार पावसाचा हाहाकार;
प्रवीण गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा संभाजी ब्रिगेडने नोंदविला अकोल्यात निषेध.
मध्यप्रदेशातून पोटाची खडगी भरण्यासाठी आलेल्या युवकाचा अपघाती मृत्यू; कुरणखेडमध्ये हळहळ
विदर्भ स्तरीय अभया परिषद उत्साहात संपन्न, कार्यकर्ता तुषार हांडे सन्मानित.
पिकविमा मंजूर तरीही थकलेली रक्कम; शेतकऱ्यांचा संताप, कृषी अधिक्षकांना निवेदन
अकोट रोटरी क्लब चा शपथग्रहण सोहळा संपन्न
“ऑपरेशन प्रहार”ची मोठी कारवाई: अकोल्यात जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांवर कारवाई, ४.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त
राज ठाकरे अडचणीत? वरळीतील वक्तव्यावरून DGPकडे तक्रार दाखल
श्रीराजराजेश्वर मंदिरात श्रावणातील पहिल्या सोमवारी भाविकांची अलोट गर्दी; कावडयात्रेने महादेवाला जलाभिषेक
श्रावणातील पहिल्या संकष्टीला गायगाव गणपती दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी!
डॉ. आंबेडकर यांच्या जीवनकार्याची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांच्या
स्मृतिस्थळांना भेट देण्याची संधी उपलब्ध करून देणे हा आहे.
या विशेष टूर सर्किटमध्ये मुंबई, नाशिक आणि नागपूर या तीन प्रमुख शहरांतील
बाबासाहेबांशी संबंधित महत्त्वाच्या स्थळांचा समावेश करण्यात आला आहे.
मुंबई टूर सर्किटमध्ये चैत्यभूमी (दादर), राजगृह, प्रिटींग प्रेस, परळमधील बी.आय.टी. चाळ,
वडाळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आणि फोर्ट येथील
सिद्धार्थ महाविद्यालय या ठिकाणांना भेट दिली जाणार आहे.
नाशिकमध्ये येवला मुक्तीभूमी, त्रिरश्मी लेणी आणि काळाराम मंदिर,
तर नागपूरमध्ये दिक्षाभूमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय, कामठी येथील ड्रॅगन
पॅलेस आणि नागलोक विहार ही स्थळे पाहता येणार आहेत.
प्रत्येक शहरात दररोज दोन बसेसद्वारे मोफत टूर आयोजित करण्यात येणार असून,
त्यामध्ये टूर गाईड, अल्पोपहार, पिण्याचे पाणी, प्राथमिक उपचार व्यवस्था तसेच
डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित माहिती पुस्तिका मोफत दिली जाणार आहे.
या उपक्रमामुळे सर्वसामान्य नागरिकांना बाबासाहेबांच्या विचारविश्वाची जवळून ओळख होणार असून,
जयंती उत्सवाच्या निमित्ताने एक प्रेरणादायी अनुभव लाभणार आहे.