“रुईखेड: श्री बागाजी महाराज यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन!”

"रुईखेड येथे श्री बागाजी महाराज यात्रेचा उत्साह, अनोख्या प्रथेने झाले स्वागत!"

रूईखेड येथे श्री बागाजी महाराज यात्रेचा भव्य सोहळा

महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी सकाळी भव्य कावड यात्रा काढण्यात आली.

श्री कपलेश्वर मंदिरातून कावडने आणलेल्या पवित्र जलाने श्री बागाजी महाराजांचा सकाळी

दहा वाजता मंदिर परिसरात संस्थान चे विश्वस्त विजय राहणे यांनी कावडदारी यांचे स्वागत व

Related News

पूजा अर्चाना केले गावातु परिक्रमा काडुन कावड यात्रा फिरल्यानंतर

श्रद्धाळू भाविकांनी आपल्या घरासमोर पूजा-अर्चना केली.रात्री श्री बागाजी महाराज

यांना कपिलेश्वर येथून आणलेल्या पवित्र जलाने अभिषेक करण्यात आला

बुधवार रोजी श्री बागाजी महाराज यांच्या मंदिरात लहान मुलांना सकाळी लोटांगण घातले जाते

व दुपारी गावातील बागाजी महाराज भजन मंडळ चा

गजरात मोठ्या मुलांचे लोटांगण घालत गावातुन काढले

व रात्री श्री बागाजी महाराज यांचे पुरातन काळातील रथ यात्रा सुरू झाली

महिलांनी आपल्या घरांसमोर रंगीबेरंगी रांगोळ्या अकाढून बागाजी महाराज यांच्या

रथाचे स्वागत व पूजा अर्चाना केले. नवस फेडण्यासाठी नारळाचे तोरण बांधण्यात आले.

यामुळे यात्रेला एक भक्तिमय व पवित्र स्वरूप प्राप्त झाले.

यात्रेचा मुख्य आकर्षण म्हणजे गुरुवार दिनांक 28 रोजी श्री बागाजी महाराज भंडारा

उत्सव समिती चा वतीने भव्य महाप्रसाद.

संपूर्ण गावातील नागरिक एकत्र येऊन महाप्रसादाच्या आयोजनात सहभागी झाले.

भक्तगणांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आणि एकोपा व सामंजस्याचा संदेश दिला.

यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी आकोट ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर गुनघरे मार्गदर्शनखाली

पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता विशेष सहकार्य केले. शिस्तबद्ध वातावरणात यात्रा पार पडली

आणि कोणत्याही अनुचित प्रकाराला वाव मिळू न देता भक्तांनी मनसोक्त श्रद्धा व्यक्त केली.

रूईखेडची श्री बागाजी महाराज यांची ही केवळ एक उत्सव नसून, ही परंपरा गावातील लोकांच्या

श्रद्धेचा व संस्कृतीचा अभिमान आहे. या यात्रेच्या निमित्ताने गावकऱ्यांमध्ये बंधुत्वाची भावना वृद्धिंगत होते

आणि संपूर्ण वातावरण भक्तिमय होते.

महाशिवरात्रीच्या दिवशी पासून पवित्र दिवशी रूईखेड यात्रेचा हा भव्य सोहळा

भविष्यातही याच भक्तिभावाने साजरा होईल, असा विश्वास भाविकांनी व्यक्त केला.

श्री बागाजी महाराज भंडारा उत्सव समिती चा वतीने

ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले

व तसेच बागाजी महाराज यात्रेनिमित्त भव्य महाआरोग्य तपासणी शिबिराचे

आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये एकूण 1900 रुग्णांनी लाभ घेतला व तसेच रक्तदान शिबिर

मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला रक्त संकलन जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला शिबिरामध्ये डॉक्टर

निखिल धांडे डॉक्टर मयूर व्यवहारे डॉक्टर दर्शन कुलट डॉक्टर परवेज खान यांनी

निशुल्क सेवा दिली त्याबद्दल त्यांचे श्री बागाजी महाराज भंडारा उत्सव समितीतर्फे आभार व्यक्त करण्यात आले..

Read more news here : https://ajinkyabharat.com/ruikhed-yehe-shri-bagaji-maharaj-yatracha-enthusiasm/

Related News