जी क्रूरता औरंगजेबाने संभाजी महाराजांच्या बाबतीत केली होती.
आज तीच क्रूरता संतोष देशमुख यांच्या हत्येत दिसली आहे.
त्यांच्या मृत्यूचा खेळ राजकारण्यांनी केला, असा आरोप शिवसेना उबाठा गटाचे
Related News
महिसागर नदीवरील पूल कोसळला; तीन मृत्यू, वाहने नदीत
धावत्या एक्सप्रेसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपी पसार, गुन्हा दाखल
राज ठाकरे यांचा पक्ष पदाधिकाऱ्यांना सक्त इशारा : ‘माझ्या परवानगीशिवाय नका बोलू मीडिया वा सोशल मीडियावर’
एक पाऊल स्वच्छते कडे ग्राम पंचायत चे अभियान!
मरण यातना : स्मशानभूमीकडे जाण्यासाठी नाल्याचे पाणी पार करावे लागते!
कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद; ११ जुलैपासून नियमन लागू
अकोला जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ८० वर; २५ वर्षांत ३१९७ शेतकरी मृत्यूचे भीषण वास्तव
“आम्ही आतंकवादी की दहशतवादी?” – अविनाश जाधव यांचा पोलिसांवर संताप
उरळ पोलिसांची जुगार अड्यावर धाड!
ब्रिक्सवर ट्रम्प यांचे टॅरिफ बॉम्ब; भारतालाही फटका बसणार का?
“वारीच्या वाटेवर शाळेचा उत्सव; भक्तिरसात न्हाल्या चिमुकल्या भावना”
आलेगाव बाभुळगाव रस्ता बनला अपघाताचा
खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुख्यमंत्री कायदा आणि न्याय यांची बूज राखत नाहीत, असेही ते म्हणाले.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, पोलिसांनी जे पुरावे, व्हिडीओ, फोटो समोर आणले ते पाहून महाराष्ट्र किती क्रूर झाला झाला आहे,
हे दिसत आहे. समोर आलेल्या गोष्टींमधून किती पराकोटीचे क्रौर्य या महाराष्ट्रात,
बीडमध्ये घडलं हेच दिसतं आहे आणि हे सर्व आरोपी मुंडे यांच्याशी संबंधित आहेत.
त्यांच्या निवडणुकीत प्रत्येक बूथवर कशाप्रकारे मतदारांना धमक्या, दहशत, दाखवून कसे मतदान करू दिले नाही
हे सत्ताधाऱ्यांनी पाहिले होते. त्यांची निवडणूक त्याचवेळी रद्द झाली असती तर आज संतोष देशमुख यांचा जीव वाचला असता,
असे खडेबोल यावेळी राऊत यांनी सुनावले. मुख्यमंत्री काही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करतात.
ते कायदा आणि न्याय यांची बूज राखत नाहीत. फडणवीस यांना जर न्याय करायचा असेल तर राज्यात
इतर कोणीही कायद्याचा गैरवापर करू नये, याची त्यांनी काळजी घ्यायला हवी,
असंही संजय राऊत यांनी म्हंटलं आहे.
Read more news here : https://ajinkyabharat.com/ruikhed-shri-bagaji-maharaj-yatranimitta-miscellaneous-program/