अकोट ग्रामीण भागात अवैध दारू विक्री व वरली मटका विरोधात निवेदन

अकोट ग्रामीण भागात अवैध दारू विक्री व वरली मटका विरोधात निवेदन

अकोट शहर प्रतिनिधी…

तालुक्यातील ग्रामीण भागात अवैधरित्या सुरू असलेल्या अवैध दारू विक्री व अवैध वरली मटका सुरू असुन हे अवैध

धंदे त्वरित बंद करण्यात यावे यासाठी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन चे ठाणेदार यांना
बहुजन युथ पेंथर आकोला जिल्ह्याच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.सदर निवेदनात जिल्हाध्यक्ष सचिन तेलगोटे व त्यांचे कार्यकर्ते

Related News

यांनी विनंती केली आहे की, आकोट ग्रामिण भागात मोठ्या प्रमाणात अवैध दारू, वरली-मटका असे अनेक अवैध धंदे चालु असल्यामुळे

अकोट ग्रामिण भागात या मुळे तनावाचे वातावरण चालू आहे. तसेच ग्रामिण भागात दारू सारख्या अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणत अवैधरित्या विक्री चालु

असल्यामुळे व वरली मटक्या मुळे ग्रामिण भागात या दारू मुळे व वरली मटक्या मुळे अनेक गुन्ह्यामागे गुन्हे घडत आहेत व अवैध दारु विक्रीचे प्रमाण दिवसेंदिवस

वाढतच चालले आहे.तेव्हा या कडे लक्ष देऊन अकोट ग्रामीण भागातील अवैध दारू व वरली मटका बंद करावा तसेच

आपण त्यावर कायदेशीर कठोर कार्यवाही करून आपण आपल्या स्तरावरुन बंदोबस्त करण्यात यावा अशी विनंती सुद्धा

निवेदनात करण्यात आली आहे. तसेच अकोट ग्रामिण भागातील अवैध धंदे करणाऱ्यांना वटनिवर आनाच तसेच अवैधरित्या सुरू असना-या

अवैध दारू, वरली-मटका बंद कराल हि विनंती सुद्धा करण्यात आली आहे या निवेदनाच्या प्रती मा. जिल्हाधिकारी आकोला, मा. पोलीस अधिक्षक अकोला,

मा. पोलीस उपविभागीय अधिकारी अकोट यांना देण्यात आल्या आहेत.या निवेदनावर जिल्हाध्यक्ष सचिन तेलगोटे सह असंख्य कार्यकर्ते यांच्या सह्या आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/sanitation-department-of-akola-municipal-corporation-conducts-investigation-campaign-against-single-use-plastic-and-thermocol/

Related News