अकोला बसस्टँड चे नूतनीकरण सुरू; जाणून घ्या कुठून मिळेल बस..

अकोला

अकोला बसस्टॅन्ड चे नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने

अकोला आगर क्र.२ मधील तेल्हारा व अकोट मार्गे जाणाऱ्या

एस टी बसेस अकोला आगर क्रमांक १ मधून सुटतिल अशी माहीती

Related News

आगार व्यवस्थापक भिवटे यांनी दिली.

अकोला शहरातील मध्यवर्ती बस स्टॅन्ड आगर क्रमांक दोन मध्ये

सिमेंट काँक्रीटीकरण आणि बस स्टॅन्डच्या नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात आले असून

त्या अनुषंगाने अकोला आगार क्रमांक दोन मधील बस गाड्या ह्या

अकोला आगर क्रमांक एक (जुने बस स्टँड, टॉवर चौक)

येथून सोडण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.

बसस्थानकाचे काम सुरू असल्यामुळे अकोट व तेल्हारा मार्गा कडुन

जाणाऱ्या व येणाऱ्या बसेस सोमवार दि.२२ जुलै २०२४ पासुन

अकोला आगार क्रं.०१ (जुने बस स्थानक) टॉवर चौक अकोला येथुन सुटतील,

त्या बसेस पुढील प्रमाणे – १)अकोला छिंदवाडा, २)अकोला परतवाडा,

३)अकोला अकोट, ४)अकोला दहीहांडा दर्यापुर

५)अकोला मनब्दा भांबेरी तेल्हारा, ६)अकोला नेर पंचगव्हान तेल्हारा

सदर बदलाबाबत प्रवाश्यांनी नोंद घेण्याचे आवाहन

आगर व्यवस्थापक दोनचे विभाग नियंत्रक भिवटे यांनी केले आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/jarangeni-legislative-assembly-288-jaga-ladhwavyat-prakash-ambedkarancha-salla/

Related News