महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात या राज्यांमध्ये मुसळधार
पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने म्हटले की,
पुढील दोन ते तीन दिवस या राज्यांमध्ये तसेच गुजरात आणि गोव्याच्या
Related News
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
बोर्डी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार : सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त
इंझोरी महसूल मंडळात २०० एकरांवर दुबार पेरणीचे संकट
“आपके नाम से हर शख्स…” शिंदेंचा शेर आणि ‘जय गुजरात’ घोषणेने चर्चांना उधाण!
सेंट पॉल्स अकॅडमी ,अकोट येथे शाळेचा स्थापना दिवस उत्साहात साजरा
गजानन नागरी पतसंस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार? ठेवीदारांची गर्दी, उपनिबंधकांकडे तक्रार
शाळेचा पहिला ‘आनंददायी’ दिवस !
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात :
नागपूरमध्ये वैद्यकक्षेत्राची क्रांती : कॅन्सरमुळे लिंग गमावलेल्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया
काही भागात मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. हवामान
खात्याने सांगितले की, बांगलादेश आणि गंगा नदीच्या लगतच्या पश्चिम
बंगाल भागात आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे.
त्यामुळे येत्या दोन दिवसांत पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशा आणि झारखंडमध्ये
ही पावसाची शक्यता आहे. याबाबत विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे.
IMD ने सांगितले की, 26 ऑगस्ट रोजी पश्चिम मध्य प्रदेशात मुसळधार
ते अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. 26 ते 29 ऑगस्टपर्यंत
पूर्व आणि दक्षिण राजस्थान, गुजरात, सौराष्ट्र आणि कच्छमध्ये असेच हवामान
कायम राहील. येत्या दोन दिवसांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, ओडिशा,
पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्येही मुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
त्यामुळे अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो. वादळी वाऱ्यासह
पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार
आज काही जिल्ह्यांना रेड अलर्टही जारी करण्यात आला आहे.
मुंबई, पालघरमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला होता. राज्यातील अनेक भागात
अतिमुसळधार पावासाचा इशारा ही देण्यात आला होता.
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचं आवाहन करण्यात आले होते.