रायगड-पुण्यात मुसळधार पावसाचा कहर! रेड अलर्ट जारी, शाळा-कॉलेज बंद

रायगड-पुण्यात मुसळधार पावसाचा कहर! रेड अलर्ट जारी, शाळा-कॉलेज बंद

रायगड/पुणे | १७ जून

रायगड आणि पुणे जिल्ह्यात पावसानं कहर केला असून, हवामान खात्याने रायगडसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.

गेल्या २४ तासांत रायगडमध्ये तब्बल १३४ मिमी पावसाची नोंद झाली असून,

Related News

मुसळधार पावसामुळे नद्यांची पाणीपातळी धोक्याच्या पातळीवर गेली आहे.

रायगडमध्ये कुंडलिका आणि आंबा नद्यांनी इशारा पातळी ओलांडली असून,

सुरक्षिततेच्या कारणास्तव जिल्ह्यातील शाळा आणि कॉलेजेसना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

पुण्यातही पावसाचा जोर कायम असून, हिंगणे खुर्द, हांडेवाडी आणि सय्यदनगर परिसरात घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत.

प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून,

नदीकिनारी न जाण्याची सूचना देण्यात आली आहे. बचाव आणि आपत्कालीन यंत्रणा कार्यरत आहेत.

Read Also : https://ajinkyabharat.com/short-brilliant-shetkya-suicide/

Related News