नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय लष्कराने राजस्थानच्या लाठी परिसरातून पाकिस्तानचा एक वैमानिक जिवंत पकडला आहे. हा वैमानिक पाकिस्तानच्या वायुदलातील असून तो JF-17 लढाऊ विमानात सवार होता. भारताने हे विमान पाडल्यानंतर वैमानिकाने आपले प्राण वाचवण्यासाठी आपत्कालीन पॅराशूटचा वापर केला. त्यानंतर तो लाठी परिसरात उतरला आणि तेथे भारतीय लष्कराच्या ताब्यात गेला.
सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या या वैमानिकाला एका गुप्त ठिकाणी ठेवण्यात आले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. अद्याप अधिकृतरीत्या त्याची ओळख उघड करण्यात आलेली नाही, मात्र तो पाकिस्तानच्या वायुदलातील वरिष्ठ अधिकारी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताची आक्रमक भूमिका
Related News
IPL 2027 मध्ये महेंद्रसिंह धोनी खेळणार की नाही? ‘इम्पॅक्ट प्लेयर’ भूमिकेला धोनीचा स्पष्ट नकार!
चेन्नई सुपर किंग्ससाठी धोनीची भूमिका काय असणार? एस. बद्रीनाथच्या दाव्याने चर्चेला उध...
Continue reading
मोदी मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होण्याची शक्यता; महाराष्ट्रातून मंत्र्यांची संख्या कमी होणार का? कोण IN, कोण OUT?
मागील अनेक दिवसांपासून केंद्रातील नरे...
Continue reading
ट्रम्प यांच्यावर अमेरिकन जनतेची खप्पामर्जी?
८९ टक्के अमेरिकन नागरिकांना वाटतोय सरकारमध्ये व्यापक भ्रष्टाचार; दोन दशकांतील उच्चांक
वॉशिंग्टन : अमेरि...
Continue reading
कोल्हापुरात तुफान राडा! राजू शेट्टी-राजेश क्षीरसागर समर्थक आमनेसामने; पोलिसांचा मोठा बंदोबस्त
कोल्हापूर : कोल्हापुरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा च...
Continue reading
भारत-चीनला नेपाळचा मोठा झटका! मदत नको, थेट नुकसानभरपाई द्या; UN मध्ये मांडणार मुद्दा
काठमांडू : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरानंतर परिस्थिती अद्यापही ग...
Continue reading
1 डॉलरच्या नाण्यावर डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो; अमेरिकेत नव्या नाण्यावरून कायदेशीर आणि राजकीय वाद
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या छायाचित्राचा समावेश असलेले
Continue reading
7.8% GDP वरून देशात चर्चा; पंतप्रधान मोदींचं पुन्हा भाष्य, भारत-बेल्जियम सहकार्यावर भर
GDP : भारत दौऱ्यावर आलेले बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेवर यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी या...
Continue reading
अभिजीत दीपकेंना मोठा झटका? सरकारी शाळांमध्ये ‘नो एंट्री’; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश
राजस्थान-उत्तर प्रदेशातील सरकारी शाळांमध्ये बाहेरील व्यक्ती, पत्रकार आणि यूट्यूबर्सना पूर्...
Continue reading
Mumbai–Pune बुलेट ट्रेनची घोषणा! दिवसातून दोनदा वडापाव-बाकरवडी खाण्यासाठी जाता येणार; 2027 मध्ये पहिली एसी लोकल धावणार
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची मोठी घोषणा; मुंबईसाठी 238...
Continue reading
EV कारचे टायर पेट्रोल-डिझेल गाड्यांपेक्षा लवकर गुळगुळीत का होतात? जाणून घ्या ‘ही’ 3 प्रमुख कारणं आणि टायरची झीज रोखण्याचे उपाय
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे देशभरात इले...
Continue reading
विद्यानंद बापटांवर हल्ला का केला? हल्लेखोर संतोष चव्हाणने सांगितले कारण; VIDEO समोर
गणेशोत्सव, डीजे आणि रोजगाराच्या मुद्द्यावरून वाद; हल्ल्यानंतर फरार झालेल्या संतोष चव्हाणला पोलि...
Continue reading
अजितदादांच्या अपघाताबाबत नाना पटोलेंचं मोठं विधान; सुप्रिया सुळेंच्या भूमिकेचं समर्थन, राष्ट्रवादीच्या आमदारांवरही सवाल
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री
Continue reading
२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-कश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या हल्ल्यात भारताचे २६ नागरिक शहीद झाले होते. त्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान व पाकव्याप्त कश्मीरमधील दहशतवादी तळांवर जोरदार हवाई हल्ले केले.
या हल्ल्याचा प्रतिशोध घेण्यासाठी पाकिस्तानकडून भारतीय सीमांवर ड्रोन व मिसाईल हल्ले करण्यात आले. मात्र भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमने हे सर्व हल्ले निष्फळ ठरवले. पाकिस्तानने भारताच्या विविध शहरांवर लढाऊ विमानांद्वारे हल्ल्याचा प्रयत्न केला, त्यातच एक JF-17 विमान भारतीय हद्दीत घुसले होते. त्याला भारताने वेळीच लक्ष्य करून पाडले आणि त्यातील वैमानिक जिवंत पकडण्यात यश मिळवले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त
भारत-पाकिस्तानमध्ये वाढत चाललेला तणाव पाहता संयुक्त राष्ट्रसंघ, अमेरिका व रशिया यांनी दोन्ही देशांनी संयम ठेवावा, असे आवाहन केले आहे. मात्र भारताने स्पष्टपणे म्हटले आहे की, राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत कोणताही तडजोड होणार नाही.
भारतीय लष्कर सध्या सर्व सीमेवर सज्ज असून पाकिस्तानकडून होणाऱ्या प्रत्येक कारवायेला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.