पारस औष्णिक विद्युत केंद्रातील कामगारांचा आनंदोलनाचा इशारा
बाळापूर, ताप्र: पारस येथील औष्णिक विद्युत केंद्रातील कंत्राटी कामगारांनी आपल्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार करत, आनंदोलनाचा इशारा दिला आहे. कामगारांनी कामगार मंत्र्याकडे वेतन वाढ आणि जीवन विम्याच्या देयकाची अदायगी न झाल्याबाबत तक्रार केली आहे.
कामगारांनी म्हटले की, रॉयल ट्रॅव्हल या कंत्राटदाराकडून कामगारांच्या हक्कांचे उल्लंघन होत आहे. महानिर्मिती मुख्यालयाच्या परिपत्रकानुसार, राज्यातील विविध औष्णिक विज केंद्रातील कंत्राटी कामगारांना वेतन, सोईसुविधा आणि अन्य हक्क उपलब्ध करणे अनिवार्य आहे. मात्र कंत्राटदारांकडून मुख्यालयीन नियम काटेकोरपणे अमलात आणले जात नाहीत, असा आरोप कामगारांनी केला आहे.
कामगारांचे म्हणणे आहे की, विज व्यवस्थापन आणि विभाग प्रमुख हे बेजबाबदार कंत्राटदारांकडून फक्त कागदी दाखला घेत आहेत आणि प्रत्यक्षात ठोस कारवाई करत नाहीत. तसेच, पारस विज केंद्राच्या कर्मचारी यांच्या पाल्यासाठी पुरवण्यात येणारी स्कूल बस सेवा देखील रॉयल ट्रॅव्हलमार्फत चालत आहे.
Related News
पोपटखेड पथकाने धाडस, समर्पण आणि सेवाभाव दाखवत आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात प्रेरणा दिली
अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या पोपटखेड येथील वीर एकलव्य आपत्कालीन शोध व ब...
Continue reading
वाडेगाव : भारत मुक्ती मोर्चा व बामसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले राष्ट्रीय अधिवेशन ओडिशा राज्यातील कटक येथे दि....
Continue reading
Mumbai बँकॉकहून भारतात परतलेल्या महिलांच्या काळ्या कारभाराचा भांडाफोड; आंतरराष्ट्रीय सरोगसी–एग डोनेशन रॅकेटचा पर्दाफाश, 2 महिलांना अटक
Mumbai: बँकॉकहून...
Continue reading
अकोला – ग्राहक संरक्षण संघ खेडकर नगरच्या कार्यालयात स्वामी विवेकानंद जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सभेचे अध्यक्ष सुधाकर गाडगे...
Continue reading
राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसह अकोला महापालिकेची निवडणूक आज सुरू झाली आहे. अकोला पश्चिमेचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांनी लक्...
Continue reading
अकोला, १५ जानेवारी: अकोला महापालिका निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी प्रभाग क्रमांक १८ मधील शहा बाबू हायस्कूल येथील मतदान केंद्रावर एक हृदयद्रावक घटना...
Continue reading
https://youtu.be/0fK1K6dPyqw?si=fwg4hRr1JgrnWWZH
अकोल्यात मकरसंक्रांतच्या दिवशी पतंग उडवण्याच्या छंदामुळे गंभीर अपघात घडला आहे. अकोल्यात...
Continue reading
खामगाव – शहरात पतंग उडवताना वापरल्या जाणाऱ्या धारदार मांजामुळे होणाऱ्या अपघातांचा धोका पुन्हा एकदा समोर आला आहे. जलंब नाका परिसरात आज मंगळवार, दि. १४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी सुमार...
Continue reading
बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे निगूर्णा नदी पात्रात उभारण्यात आलेल्या कोल्हापूरी बंधाऱ्याचे एक गेट अज्ञात व्यक्तींनी फोडल्याची गंभीर घटना समोर आ...
Continue reading
Relief for Central Government Employees ! AICPI-IW इंडेक्सनुसार महागाई भत्त्यात (DA) वाढ, वेतनात होणार महत्वाची वाढ
Central Government च्या...
Continue reading
कामगारांनी व्यवस्थापनाला वेळोवेळी पत्राद्वारे समस्या सांगितली असतानाही योग्य न्याय मिळत नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. कंत्राटी कर्मचार्यांचा दावा आहे की, कार्यकारी अभियंता, विभाग प्रमुख आणि विज व्यवस्थापन कंत्राटदारांची पाठराखण करत आहेत, ज्यामुळे कामगारांचे कायदेशीर हक्क उल्लंघन होत आहेत.
सर्व रॉयल ट्रॅव्हल कर्मचारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे की, येत्या काही दिवसात महानिर्मिती मुख्यालयाचे सीएमडी यांना या प्रकरणी कायदेशीर पत्र पाठवले जाईल.
read also : https://ajinkyabharat.com/7-amazing-benefits-of-drinking-water-it-is-an-important-remedy-for-the-body/