प्रियांका गांधीं वायनाडमधून भरणार उमेदवारी अर्ज

वायनाड:  काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी – वाड्रा बुधवारी (23 ऑक्टोबर) वायनाड पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी त्या कालच केरळमध्ये दाखल झाल्या होत्या. आज सकाळी त्यांनी स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्जावर स्वाक्षरी केली. त्यानंतर सकाळी 11 वाजल्यानंतर कालपेट्टा नवीन बसस्थानकापासून रोड शोला सुरुवात केली. मोठे शक्ती प्रदर्शन करत त्यांची रॅली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहचेल आणि त्यानंतर त्या उमेदवारी अर्ज दाखल करतील.

 

निवडणूक आयोगाने वायनाड पोटनिवडणुकीची घोषणा केल्यानंतर काँग्रेसने प्रियांका गांधी यांना केरळमधील वायनाड मतदारसंघातून उमेदवारी देणार असल्याचे जाहीर केले होते. काँग्रेसने वायनाडमधून एआयसीसी सरचिटणीस यांना उमेदवारी दिल्यानंतर, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मतदारसंघात पोस्टर लावले होते, ज्यावर “वायनाडित प्रियंकर (वायनाडचे प्रिय)” असे लिहिले होते. गेल्या आठवड्यात, निवडणूक आयोगाने वायनाड लोकसभा जागेसाठी पोटनिवडणुकीची घोषणा केली आणि यासह, केरळ मतदारसंघातून प्रियांका गांधी यांच्या निवडणूक पदार्पणासाठी मंच तयार झाला आहे, जिथून त्या सक्रिय राजकारणात सामील होण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

Related News

 

पण दुसरीकडे,  2024 च्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही मतदारसंघातून विजय मिळवल्यानंतर राहुल गांधींनी अमेठी राखण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे वायनाडची जागा रिक्त झाली असून भारतीय जनता पक्षाने (भाजप) वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी प्रियांका गांधी यांच्या विरोधात नव्या हरिदास यांना उमेदवारी दिली आहे. व्यवसायाने मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या नव्या यांनी 2007 मध्ये बी.टेक पूर्ण केले. त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाइलनुसार, ती कोझिकोड कॉर्पोरेशनमध्ये नगरसेवक आहे आणि भाजप महिला मोर्चाच्या राज्य सरचिटणीस म्हणून पक्षासाठी काम करते.

Related News