पंतप्रधान मोदींचं जनतेला दिवाळी गिफ्ट!

29 ऑक्टोबरला करणार मोठी घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आणखी एक मोठी घोषणा करण्याची

शक्यता आहे. नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात

Related News

देशात अनेक आरोग्यविषयक योजना सुरू करण्यात आल्या.

यामध्ये आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आयोग्य योजना ही एक

केंद्र सरकारची महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत

आतापर्यंत सत्तर वर्षांपर्यंत वय असलेल्या नागरिकांना मोफत

उपचार मिळत होते. मात्र आता लवकरच या योजनेचा विस्तार

होण्याची शक्यता आहे. आता या योजनेंतर्गत ज्यांचं वय सत्तर

वर्षांपेक्षा अधिक आहे त्यांना देखील मोफत उपचार मिळणार

आहेत, या योजनेच्या विस्ताराबाबत येत्या 29 ऑक्टोबरला

घोषणा होण्याची शक्यता आहे.यासोबतच नियमित लसीकरणाची

नोंद ठेवण्यासाटी विकसित केलेलं U-WIN पोर्टल देखील याच

दिवशी लाँच केलं जाणार आहे. येत्या मंगळवारी म्हणजेच 29

ऑक्टोबरला आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आयोग्य योजनेच्या

विस्ताराची घोषणा होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे ज्यांचं वय

सत्तर वर्षांपेक्षा जास्त आहे त्यांना देखील मोफत उपचार मिळू

शकणार आहेत. सोबतच U-WIN पोर्टल देखील याच दिवशी

लाँच केलं जाणार आहे. या पोर्टलच्या माध्यमातून देशातील

गर्भवती महिला आणि जन्मापासून ते 17 वर्षांपर्यंत बालकांच्या

लसीची प्रत्येक नोंद ठेवली जाणार आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या 29 ऑक्टोबरला आयुष्यमान

भारत प्रधानमंत्री जन आयोग्य योजनेच्या विस्ताराची घोषणा

होणार आहे, या योजनेच्या विस्ताराचा फायदा हा 4.5 कोटी

कुटुंबांमधील तब्बल सहा कोटी नागरिकांना होणार आहे. या

योजनेची व्यापकता वाढवल्यानंतर सत्तर वर्षांपेक्षा अधिक वय

असलेली कोणतीही व्यक्ती या योजनेंतर्गंत उपचार मिळवण्यास

पात्र असणार आहे. या योजनेंतर्गंत पाच लाख रुपयांपर्यंतचे

उपचार मोफत केले जातात.

Read also: https://ajinkyabharat.com/mumbai-local-service-kollamdali-on-the-first-day-of-diwali/

Related News