मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असणाऱ्या मुंबई लोकलची
सेवा कोलमडली आहे. दिवाळी सणाच्या पहिल्या दिवशी पश्चिम
Related News
महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी
मुर्तिजापूर बसस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ, ओळख अद्यापही गूढ!
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
WCL मध्ये नोकरीचं आमिष दाखवून अकोल्यातील २५ बेरोजगारांची अडीच कोटींची फसवणूक; माजी आमदाराच्या नावाने धमकीचा आरोप
ठाकरेंना दुबेंचं थेट आव्हान : “हिम्मत असेल तर बिहारमध्ये या!”
अकोट खरेदी-विक्री संघ ज्वारी खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून गुन्हे दाखल करा
ग्रामीण भागातील पांदन रस्त्याची अवस्था बिकट
शेत रस्त्याचे रूपांतर तलावात : शेतकरी हतबल
पंढरीत विठ्ठल भक्तांचा महापूर
राजकीय चर्चा थांबवा! राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश
| गोवंश तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला
रेल्वेचा मोठा खोळंबा झाला आहे. पश्चिम रेल्वेवरील केळवे रोड
स्थानकात इंजिन फेल झाल्याने अनेक लोकल, एक्सप्रेस गाड्या
यांची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल
होताना दिसत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वे
मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. यामुळे मुंबईकडे
येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावत आहेत. पश्चिम
रेल्वेवरील केळवे रोड स्थानकादरम्यान इंजिन फेल झाले आहे.
त्यामुळे गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या अनेक गाड्यांचा खोळंबा
झाला आहे. या तांत्रिक बिघाडामुळे वंदे भारत एक्सप्रेसही पालघर
स्थानकावर रखडली आहेत. केळवे रोड स्थानकात झालेल्या
बिघाडामुळे पालघर ते विरार, आणि पालघर ते चर्चेगेट या दिशेने
धावणाऱ्या लोकल धीम्या गतीने धावत आहेत.
दरवर्षी दिवाळी आणि छट पुजेसाठी लाखो उत्तर भारतीय मुंबईतून
उत्तर प्रदेशला जात असतात. मुंबईहून उत्तर प्रदेशात
जाण्यासाठीच्या अनेक गाड्या या पश्चिम रेल्वेमार्गे धावतात. यामुळे
रेल्वे प्रशासनाकडून विशेष रेल्वे गाड्यांचे आयोजन करण्यात आले
आहे. उधना ते गोरखपूर यादरम्यान विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात
आल्या आहेत. २५ ऑक्टोबरपासून ६ नोव्हेंबरपर्यंत या विशेष
गाड्या रेल्वे प्रशासनाकडून चालवण्यात येणार आहेत.
दरम्यान दिवाळीच्या पहिल्याच दिवशी केळवे स्थानकात झालेल्या
तांत्रिक गोंधळामुळे अनेक एक्सप्रेस गाड्यांना लेटमार्क लागला
आहे. लांब पल्ल्याच्या गाड्या उशिरा धावत असल्याने प्रवाशांना
त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे अनेक प्रवाशी संतप्त झाले
आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/12-fishermen-from-tamil-nadu-caught-by-sri-lankan-navy/