महाराष्ट्रातील विकासाच्या दुश्मनांना सत्तेच्या बाहेर ठेवा, पंतप्रधान मोदींचा सल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्रा दौऱ्यावर आले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच ठाण्यातील विविध विकास

कामांचे लोकापर्ण करत त्याचा आढावा घेतला. यावेळी पंतप्रधान

Related News

मोदींनी काँग्रेससह महाविकासाआघाडीवर जोरदार निशाणा

साधला. महाराष्ट्रातील विकासाच्या या दुश्मनांना सत्तेच्या बाहेर

ठेवा. शेकडो मैल दूर ठेवा, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाण्यात जोरदार भाषण केले.

महाराष्ट्राच्या विकासाची ही सुपर फास्ट स्पीड आहे. आजचा

दिवस महाराष्ट्राच्या उज्वल भविष्याची झलक देत आहे. महायुती

सरकारने मुंबई एमएमआरमध्ये ३० हजार कोटी पेक्षा अधिक

रकमेची विकासकामे करत आहोत, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

एकीकडे महायुती काम करत आहे. तर महाविकास आघाडी विरोध

करत आहे. महाविकास आघाडी ही विकासाला विरोध करणारी

आघाडी आहे. त्यांनी अहदाबाद मुंबई बुलेट ट्रेनचं काम पुढे सरकू

दिलं नाही. त्यांनी महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील पाण्याशी

संबंधित प्रकल्पही बंद पाडलं. लोकांची तहान भागवण्यासाठी

सुरू झालेले प्रकल्प त्यांनी थांबवले. तुमची प्रत्येक कामे ते रोखत

होते. आता त्यांना रोखा. महाराष्ट्रातील विकासाच्या या दुश्मनांना

सत्तेच्या बाहेर ठेवा. शेकडो मैल दूर ठेवा, असा सल्ला नरेंद्र मोदी

यांनी दिला.

Read also: https://ajinkyabharat.com/threat-to-kill-gunaratna-sadavarte/

Related News