महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीला आता काही दिवसांचाच
अवधी शिल्लक आहे. यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यात
विकासकामांचा धडाका लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
Related News
JSW ची भारतीय ऑटो मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; ५ नव्या SUVs मुळे Creta, Thar आणि Fortunerची वाढणार डोकेदुखी
भारतीय ऑटोमोबाईल बाजारपेठेत आगामी काळात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता...
Continue reading
मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते 1000 मुलींना ‘सुकन्या समृद्धी’चे धनादेश; दरवर्षी 20 हजार रुपये, 10 वर्षे सरकार करणार जमा
मुलींच्या भवितव्यासाठी आणि त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ...
Continue reading
मेनोपॉजमध्ये हाडे, हृदय आणि हार्मोन्सच्या आरोग्यासाठी कोणता आहार महत्त्वाचा? महिलांनी ‘या’ पदार्थांचा आहारात नक्की करा समावेश
मेनोपॉज म्हणजेच रजोनिवृत...
Continue reading
सकाळची सुरुवात करा मूठभर अक्रोडांनी; हृदयापासून मेंदूपर्यंत मिळतील 'हे' 5 आश्चर्यकारक फायदे
आजकाल निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष दिले जाते. रोजच्या आहारात जी...
Continue reading
Saurav Das: 25 वर्षांच्या तरुणीच्या मागे पोलीस हात धुवून लागले; सौरव दास भडकला, म्हणाला- ‘तुम्ही आधी…’
जंतर मंतर येथे झालेल्या NEET पेपरफुटीविरोधातील आं...
Continue reading
मोठी बातमी! तुकाराम मुंडेंना हायकोर्टाचा मोठा दणका; आता FDA समोर फक्त दोन पर्याय, मंत्रालयाच्या कँटीनवरून कोर्ट नाराज
मंत्रालयातील कँटीनच्या स्वच्छतेचा मुद्दा आता थेट मुंबई उच्च न...
Continue reading
RBI चा मोठा निर्णय! बँकांच्या व्याजदराचा नियम बदलला; आता मोठ्या ठेवींवर गरजेनुसार मिळणार वेगवेगळा दर
बँकिंग क्षेत्र आणि मोठ्या गुंतवणूकदारांसाठी
Continue reading
थायरॉईडचा तरुणांनाच नाही तर लहान मुलांवरही होतोय परिणाम; पालकांनो ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष
आजच्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम केवळ मोठ्य...
Continue reading
TVS चा मोठा धक्का; जुपिटर आणि रेडर महागल्या, पण ‘या’ स्पोर्टी स्कूटरची किंमत झाली कमी
TVS मोटर कंपनीने आपल्या टू-व्हीलर पोर्टफोलिओच्या किमतींमध्ये मोठा ब...
Continue reading
मार्वेल फॅन्ससाठी मोठी खुशखबर! नव्या ‘Doctor Doom’ ग्राफिक्ससह TVS Raider 125 लाँच; किंमत अवघी 95 हजारांच्या आत
मार्वेल फॅन्स आणि बाईकप्रेमींसाठी मोठी खुशखबर आहे.
Continue reading
जीव वाचवण्यासाठी अनेकांच्या उड्या, तर कुत्र्याच्या पिल्लासाठी आईची धडपड; भिवंडीत मध्यरात्री नेमकं काय घडलं?
भिवंडी : भिवंडीतील नारपोली परिसरातील गंगारा...
Continue reading
हस्ते आज रविवारी पुणे येथील मेट्रोच्या कामाचे लोकार्पण केले
जाणार आहे. दुपारी 12.30 ते 1.05 यावेळेत व्हिडिओ
कॉन्फरन्सद्वारे हे लोकार्पण होणार असून यावेळी मोदींकडून
महाराष्ट्राला तब्बल 11,200 कोटींच्या विकास प्रकल्पाचे गिफ्ट
दिले जाणार आहे. यात पुणे मेट्रोचा जिल्हा न्यायालय ते स्वारगेट
विभाग, बिडकीन औद्योगिक क्षेत्र, सोलापूर विमानतळ आणि इतर
यांचा समावेश आहे. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट दरम्यानच्या
भुयारी मार्गावरील मेट्रोच्या कामाला तब्बल 1,810 कोटी रुपये
खर्च येणार आहे. पुणे मेट्रो फेज-१ च्या स्वारगेट ते कात्रज
विस्ताराची पायाभरणी पंतप्रधान मोदी करणार असल्याचे
पीएमओने सांगितले आहे. यासाठी अंदाजे 2,955 कोटी रुपये
इतका खर्च केला जाणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित
पवार देखील ऑनलाइन उपस्थित राहणार आहेत. याबाबत
पंतप्रधान कार्यालयाने शनिवारी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी
जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या पुणे मेट्रो विभागाचे उद्घाटन
करतील. त्यासोबतच पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प (फेज-1) पूर्ण होईल.
अंदाजे 5.46 किमीचा हा दक्षिण विभाग मार्केट यार्ड, पद्मावती
आणि कात्रज या तीन स्थानकांसह पूर्णपणे भूमिगत आहे.
पंतप्रधान राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रमांतर्गत
7,855 एकर क्षेत्राचा कायापालट करणारा छत्रपती संभाजीनगर
जिल्ह्यातील बिडकीन औद्योगिक क्षेत्राचे देखील ऑनलाइन
लोकार्पण केले जाणार आहे. याचसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांच्या हस्ते क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले स्मारक पुण्यातील भिडे
वाडा येथे पहिल्या मुलींच्या शाळेचं भूमिपूजन देखील केले जाईल.
तर बिडकीन औद्योगिक क्षेत्र, छत्रपती संभाजीनगर लोकार्पण
आणि सोलापूर विमानतळाचे उद्घाटन देखील मोदी यांच्या हस्ते
ऑनलाइन पद्धतीने केले जाईल.
Read also: https://ajinkyabharat.com/major-reshuffle-in-the-cabinet-of-tamil-nadu-government/