वीर एकलव्य आपत्कालीन शोध व बचाव पथकाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून गौरव

वीर एकलव्य

पोपटखेड पथकाने धाडस, समर्पण आणि सेवाभाव दाखवत आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात प्रेरणा दिली

अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या पोपटखेड येथील वीर एकलव्य आपत्कालीन शोध व बचाव पथक यांना अकोला जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सन्मानित प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले आहे.

मान्सून २०२५ दरम्यान विविध शोध व बचाव मोहिमा, कावड यात्रा बंदोबस्त, गणपती विसर्जन आणि इतर आपत्कालीन परिस्थितींमध्ये या पथकाने दाखवलेले धाडस, समर्पण आणि सेवाभाव हे खरोखर प्रेरणादायी ठरले.

गौरव समारंभात आपत्कालीन बचाव पथकाचे प्रमुख पांडुरंग तायडे यांना शाल आणि श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कार वितरणासाठी उपस्थित होते – पालकमंत्री आकाश फुंडकर, जिल्हाधिकारी वर्षा मीना आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक.

Related News

जिल्हा प्रशासनाने या पथकाच्या अपवादात्मक कार्याचे प्रमाणपत्र देऊन त्यांच्या सेवाभावाची दखल घेतली आहे.

read also : https://ajinkyabharat.com/7-simple-and-effective-ways-to-reduce-winter-headache/

Related News