अकोला, दि. 14: अकोल्यातील छोट्या उद्योग आणि व्यावसायिकांसाठी निर्यातवाढीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे.
अकोला डाकघर निर्यात केंद्रातून पहिल्यांदाच अमेरिकेला भांड्यांचे पार्सल पाठविण्यात आले आहे. एका व्यावसायिकाला व्यापार
संकेतस्थळावर मिळालेल्या ऑर्डरनुसार हे पार्सल रवाना करण्यात आले.छोट्या आणि किरकोळ व्यावसायिक-उद्योजकांसाठी
Related News
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी सोपे घरगुती उपाय….
कांगो नदीत भीषण बोट दुर्घटना;
फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
हे केंद्र निर्यातीसाठी सुवर्णसंधी मानले जात असून, परदेशी व्यापारासाठी मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये
जाऊन एजंट नेमण्याची गरज आता उरली नाही. या केंद्राच्या माध्यमातून स्थानिक व्यावसायिकांना त्यांच्या वस्तू जगभर
पाठविण्याची सुविधा मिळणार आहे. तसेच, निर्यात केलेल्या वस्तूंच्या ट्रॅकिंगसाठीही विशेष सेवा उपलब्ध आहे.
निर्यात मार्गदर्शन कार्यशाळा: जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने जुन्या सुती बाजारातील पंचशील इमारतीत उद्योजकांसाठी निर्यात मार्गदर्शन
कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत टपाल कार्यालयाचे विपणन अधिकारी गजानन राऊत
यांनी निर्यातीसंदर्भात माहिती दिली. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष बनसोड यांनी यावेळी सांगितले की,
निर्यातीला प्रोत्साहन देणे आणि रोजगारनिर्मिती हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
कार्यशाळेत उद्योग विभागाचे साकेत पांडे, सनदी लेखापाल नवीन कृपलानी, सल्लागार अंकित गुप्ता,
आकाश शहा, लघुउद्योग सल्लागार प्रीतम लोणकर, तसेच वस्तू व सेवा कर विभागाचे प्रवीण भोपळे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्योग निरीक्षक अंकिता पाचंगे यांनी केले, तर अधिक्षक भगवंत अनवणे यांनी आभार मानले.
या कार्यशाळेला मोठ्या संख्येने उद्योजक, नवउद्योजक आणि अधिकारी उपस्थित होते. अकोला डाकघर निर्यात केंद्राच्या
या उपक्रमामुळे छोट्या उद्योगांना जागतिक बाजारपेठेत आपले स्थान निर्माण करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.