Exclusive
विठ्ठल महल्ले
अकोला : शहरात एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन येथे कार्यरत पोलीस अंमलदार गिरीष दशरथ खडके रा. बलोदे लेआउट, हिंगणा रोड यांच्या पत्नी सौ. आरती खडके यांचे मोबाईलवरील व्हॉट्सअॅप अकाऊंट अज्ञात इसमाने हॅक केले. त्यानंतर त्यांच्या एचडीएफसी बँक खात्यातून तब्बल 1 लक्ष 70 हजार इतकी रक्कम ऑनलाईन पद्धतीने काढून घेण्यात आली. या संदर्भात खदान पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे.
Related News
पातूर: महाराष्ट्रातील टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अकोल्याचे युवा खेळाडू चमकले असून, अकोला जिल्ह्याचे चार खेळाडू राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करण...
Continue reading
अकोल्यातून एक संवेदनशील आणि माणुसकी जपणारी घटना समोर आली असून, समाजात सकारात्मक संदेश देणारी ही बाब सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पोस्ट ऑफिस चौकात रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेला
Continue reading
गेल्या 13 वर्षांपासून रखडलेला नरनाळा महोत्सव यंदा पुन्हा सुरू, शहानूर–पोपटखेड रस्त्याच्या कामावर नागरिक नाराज
अकोला : गेल्या 13 वर्षांपासून विविध कारणांमुळे स्थगित झालेला
Continue reading
अकोल्यातील रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक एकच्या बाजूला असलेल्या विहिरीत एका युवकाचे प्रेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धा...
Continue reading
अकोला जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन प्रहार’ मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत अवैध गॅस रिफिलिंग करणारे ...
Continue reading
१ वर्षापेक्षा कमी वयाच्या बाळांना नारळ पाणी देणं योग्य की धोकादायक? पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती
आजच्या आरोग्यजागरूक युगात नारळ पाण्याला “नैसर्गिक...
Continue reading
बोरगाव मंजू – राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू नवीन बायपासच्या जवळ उभ्या कारला ट्रकने धडक दिली. सुदैवाने कारमध्ये चारही प्रवासी बाहेर असल्यामुळे म...
Continue reading
कोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातील उरळ पोलीस स्टेशन हद्दीत आज सोमवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. निंबा-तेल्हारा मार्गावरील कारंजा फाट्याजवळ...
Continue reading
टाकळी बु : अकोला-वाशिम जिल्हा बँकेवर विजय म्हैसने यांची प्रतिनिधी म्हणून निवड
अकोट तालुक्यातील टाकळी बु सेवा सहकारी सोसायटीतील विशेष सभेत विजय रमेशराव म...
Continue reading
भाऊसाहेब बिडकर विद्यालयात संविधान दिन उत्सव साजरा
अनोरा, अकोला – भारतीय संविधान दिन उत्साहात आणि भक्तिभावाने भाऊसाहेब बिडकर विद्यालय अनभोरा येथे मोठ्...
Continue reading
अकोल्याचा अभिमान: प्रभु श्रीराम मंदिरावर भगवा ध्वज आणि अभिषेक मानोरकर यांचे भव्य एनिमेशन
अकोल्याचा अभिमान उंचावणारा ऐतिहासिक क्षण: भगवा ध्वज उभारल्याच्या...
Continue reading
ही घटना दिनांक २५ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३:१२ ते ३:३० या दरम्यान घडली. हॅक झालेल्या मोबाईलवरून संशयित इसमाने त्यांच्या एचडीएफसी बँकेच्या खात्यातून अनुक्रमे पन्नास हजाराचे तीन वेळा ट्रांजेक्शन केले तर २० हजाराचे चौथे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स करून एकूण १.७० लाख रुपयांची फसवणूक केली.या प्रकरणी सौ.आरती खडके यांनी तात्काळ खदान पोलीस स्टेशनला धाव घेत तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३१८(४) भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच कलम ६६(D) माहिती तंत्रज्ञान अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
घटनेनंतर खदान पोलीस ठाण्याने तपासाची चक्रे गतीमान केली आहेत.
पोलिसांकडून बँकेशी संपर्क साधून सर्व व्यवहारांचे तपशील मागविण्यात आले आहेत. तसेच संशयिताने कोणत्या आयपी ऍड्रेसवरून व्यवहार केले याचा डिजिटल फॉरेन्सिक तपास सुरू आहे.तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, संशयिताने कोणत्या तरी पद्धतीने पीडितेचा OTP किंवा खाते ऍक्सेस प्राप्त करून हे व्यवहार केले असावेत, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांकडून मोबाईल फोन, व्हॉट्सअॅप लॉग आणि व्यवहारांचे ट्रेल्स तपासण्यात येत असून, पैसे ज्या खात्यांमध्ये पाठवले गेले आहेत त्यांची माहिती गोळा केली जात आहे.
पोलिसांनी नागरिकांना अशा प्रकारच्या ऑनलाईन फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीस OTP, बँक तपशील अथवा वैयक्तिक माहिती देऊ नये तसेच व्हॉट्सअॅपमध्ये दोन-घटक प्रमाणीकरण सुरू ठेवावे, असा सल्लाही दिला आहे.
read also : https://ajinkyabharat.com/income-tax-free-countries-such-10-countries-where-your-income-remains-safe-and-tax-free/