शेलुबाजार वार्ता | पिंपळखुटा
दि. २३ जून २०२५ रोजी ग्राम पिंपळखुटा येथील जिल्हा परिषद शाळेत शाळा प्रवेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी आणि गावातील विद्यार्थी
Related News
पिंजर पोलिसाकडून अमली पदार्थ मिशन उडान दिनानिमित्त विविध विद्यालयातील विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन
जागतिक अंमली पदार्थविरोधी दिनानिमित्त ‘मिशन उडान’ अंतर्गत अकोला पोलिसांकडून भव्य जनजागृती उपक्रम
राजेश्वर मंदिराच्या विकासावरून आरोप-प्रत्यारोप; भाजपाची आमदार पठाण यांच्यावर टीका
दानापुर येथे राजर्षी शाहु महाराज जयंती उत्सव संपन्न
रशियात खासगी दौऱ्यावर गेलेले शशि थरूर; मॉस्कोमध्ये रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
धामणगाव (गो.) येथे शाळा प्रवेशोत्सवाचा जल्लोष
“यशाला कोणताही शॉर्टकट नाही” – प्राचार्य अशोक थोटांगे यांचे मार्गदर्शन
रुग्णवाहिकेने कुत्र्याला धडक दिली; संतप्त मालकाने चाबी काढली, पेशंटचा मृत्यू
बाळापूर तालुक्यात शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप; सोया+तूर प्रकल्प अंतर्गत उपक्रम
ईपीएफओकडून पीएफ सदस्यांना दिलासा : आता ५ लाखांपर्यंत मिळणार ऑटो अॅडव्हान्स
IRCTC ची “भारत गौरव” पर्यटक रेल्वे यात्रा: ज्योतिर्लिंग दर्शनासाठी खास संधी!
मंगेश तांगडे सरपंच पदावर पुन्हा रुजू
शिक्षणासाठी बाहेर जाण्याऐवजी गावातच शिकावेत, या हेतूने हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा तालुका अध्यक्ष सुदर्शन पाटील धोटे होते.
यावेळी सरपंच सौ. दिपाली धोटे, शिक्षणतज्ज्ञ पुंडलिक गिरी, जनार्दन पाटील परंडे (शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष)
व मुख्याध्यापक संतोष तिवसकर यांच्यासह ग्रामस्थ आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुदर्शन धोटे यांनी आपल्या भाषणात जिल्हा परिषद शाळेचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की,
“आज महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळांमधून अनेक क्लास वन अधिकारी घडले आहेत.
पुण्यातील एका जिल्हा परिषद शाळेला जागतिक पातळीवर गौरव मिळालाय.
मराठी शिक्षण आणि संस्कृती देशाला दिशा देणारी आहे.” त्यांनी पालकांना आपल्या मुलांचे शिक्षण
गावातच होण्यासाठी जिल्हा परिषद शाळा टिकवण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे संयोजन गावंडे सर, ठोंबरे सर, डवरे मॅडम व इतर शिक्षकांनी केले.
प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी गावंडे गुरुजींनी उपस्थितांचे आभार मानले.
Read Also : https://ajinkyabharat.com/pimpri-chinchwadamadhye-double-murder-marriage/