अकोला:- १० दिवसापासून उपोषणाला बसलेल्या अकोला औद्योगिक श्रेत्रातील ए डी एम ऍग्रो कंपनीच्या सुरक्षा रक्षकांना स्थानिक
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकाऱ्यांनी उचित न्याय मिळवून दिला.ए डी एम ऍग्रो कंपनीने दि ८ एप्रिल पासून त्यांची सुरक्षा रक्षक पुरवणारी
सेफ ग्रार्ड नामक जुनी कंपनी चे काम बंद करून गुरगाव हरयाणा स्थित पॅराग्रीन नामक कंपनीला
सुरक्षा रक्षक पुरवण्याचे कंत्राट दिले आहे.तश्या बाबतीचे पत्र तिथे मागील १० वर्षांपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा दिले होते.
Related News
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
सुदैवाने जीवितहानी टळली….
मुर्तीजापुरात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांनी घेतली गस्त मोहीम हाती
पारंपरिक शेती करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणी
सानंदांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी ( अजित पवार ) मध्ये प्रवेश
नवीन कंपनीतच जुन्या कर्मचाऱ्यांना समाविष्ट करण्यासाठी कामगार गेल्या १० दिवसापासून फॅक्टरी च्या गेट वर उपोषणाला बसले होते.
आज जसे नवीन कंपनीचे कंत्राट सुरू झाले तसे त्यांनी नवीन कामगार भरती संदर्भात हालचाली सुरू केल्या होत्या.
ह्या बाबीची मनसे कार्यकर्त्यांना माहिती पडताच त्यांनी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना ह्याची माहिती दिली.त्यानंतर मनसे पदाधिकारी ए डी एम ऍग्रो च्या कारखान्यात गेले
असता तिथे कंपनीचे एच आर मॅनेजर चंद्रभुषण शर्मा ह्यांची भेट घेतली व त्यांना सर्व जुने कामगार ह्यांना पुन्हा नवीन कंपनीत समाविष्ट करण्यासाठी मनसे स्टाईल समजावून सांगितले
तसेच त्यांच्या कडून तसे लिहून पण घेतले.त्यानंतर नवीन कंपनी पॅराग्रीनचे संचालक
गुरमीतसिंग ह्यांच्यासोबत कामगारांची बैठक घेऊन त्यांच्या कडून पण कामगारांना आश्वस्त केले की सर्व सुरक्षा रक्षकांना पुन्हा सेवेत कायम ठेवण्यात येईल.
तसेच त्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू करून देण्यात आली. या वेळी सर्व कामगारांनी जल्लोष केला व मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे व स्थानिक पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
ह्यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे,उपजिल्हाध्यक्ष सतीश फाले, अकोला शहर अध्यक्ष सौरभ भगत,मनविसे जिल्हाध्यक्ष रणजित राठोड,
मनविसे तालुकाध्यक्ष सौरभ फाले, उपशहर शुभम कवोकार,मुकेश धोंडफळे, अमोल भेंडारकर,मंगेश देशमुख,निलेश स्वर्गीव,
डॉ प्रसन्न सोनार निलेश आगरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.