अकोला | प्रतिनिधी
अकोल्यातील पळसो बढे गावाच्या कासमपुर भागात रात्रीच्या सुमारास तीन संशयित
चोरट्यांचा गावात प्रवेश झाल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले.
Related News
निवासी वसतिगृहात रॅगिंगचा धक्कादायक प्रकार अधिकाऱ्यांकडून प्रकरण दडपण्याचा आरोप….
🇮🇳 पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात संतापाची लाट; पाकिस्तानात शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांबाबत चर्चेला उधाण
मलेरियाचा धोका कायम! महाराष्ट्रात पुन्हा वाढले रुग्ण; लक्षणं, कारणं आणि खबरदारी जाणून घ्या
अतिरेक्यांची बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न करताना दिला जीव
हृदयद्रावक घटना! ७ वर्षांनी झालेलं बाळ
कारवाईचे संकेत! भारत 7 दिवसांत पाकिस्तानवर मोठा वार करू शकतो….
उष्णतेचा चटका!
पहलगाम हल्ल्यानंतर संतापाची लाट
श्रीनगरमध्ये अडकलेल्या अकोल्याच्या सहा नागरिकांना परत
पहलगाम हल्ल्याचा मोठा परिणाम:
“आता बस्स! आतंकवाद संपवाच – मुर्तीजापुरातून संतप्त आवाज”
मरणातही जर सन्मान नसेल, तर जिवंतपणी न्यायाची अपेक्षा कशी करायची?”
त्यांच्या सतर्कतेमुळे एक चोरटा पकडण्यात ग्रामस्थांना यश आले, तर इतर दोघे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.
गावातील काही युवकांनी रात्री महिलांच्या शौचालय परिसरात संशयित हालचाली पाहिल्या.
त्यांनी इतर ग्रामस्थांना बोलावले आणि पाठलाग सुरू केला. यावेळी एक चोरटा
शेतातील ज्वारीच्या गव्हणीमध्ये लपलेला आढळून आला.
ग्रामस्थांनी त्याला पकडून झडती घेतली असता, त्याच्याजवळ आधार कार्ड मिळाले.
पकडलेल्या चोरट्याचे नाव रोशन राजू सिडाम (२५), रा. शेलवाडी, पो. अनभोरा असल्याचे समोर आले आहे.
ग्रामस्थांनी काही काळ त्याला मारहाण करण्याचाही प्रयत्न केला, मात्र काही विवेकी
नागरिकांनी हस्तक्षेप करत त्याला वाचवले आणि बोरगाव मंजू पोलिसांना याबाबत कळवले.
गावकऱ्यांचा संयम आणि पोलिसांची भूमिका
गावातील काही दिवसांपासून घरफोड्या आणि शेतसाहित्य चोरीच्या घटना वाढल्या असल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता.
पोलीस गस्त वाढविण्याची मागणीही वारंवार केली जात होती.
मात्र चोरी थांबत नसल्याने नागरिकांनी रात्री स्वतः गस्त देण्यास सुरूवात केली होती.
या घटनेनंतर संपूर्ण गाव घटनास्थळी जमा झाले होते. पकडलेला चोर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून,
पुढील तपास बोरगाव मंजू पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे.
विशेष:
ही घटना ग्रामसुरक्षेच्या दृष्टीने लोकसहभागाचे महत्त्व अधोरेखित करते. मात्र अशा वेळी कायदा हातात न घेता,
पोलिसांना त्वरित माहिती देणे अधिक योग्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/acolateal-contaminated-panyacha-ques/