दरवर्षी पावसाळा प्रारंभ झाल्यानंतर भाजी बाजारात पालेभाज्या व फळभाज्यांचे दर वाढतात.
यावर्षी सुद्धा पावसाळा प्रारंभ होताच भाजी बाजारात भाज्यांचे दर
मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत.
Related News
त्यामुळे नागरिकांना भाज्यांसाठी जास्त पैसे मोजावे लागत असून
पावसाळा संपेपर्यंत ही भाज्यांची दरवाढ कायम राहणार असल्याचे दिसून येते.
पावसाळ्याच्या तोंडावर बाजारात भाज्यांची आवक कमी होते.
त्यामुळे दरवर्षी भाज्यांचे दर वाढतात.
यावर्षी अद्याप पाहिजे तसा पाऊस झालेला नाही मात्र भाज्यांची आवक कमी झाल्याने
भाज्यांचे दर वाढलेले आहेत.
पावसाळ्या व्यतिरिक्त एका कुटुंबाचा आठवड्याचा भाजीपाला ३०० ते ४०० रुपयांमध्ये होतो.
त्यासाठी आता आठवड्याला ५०० ते ६०० रुपये मोजावे लागणार आहेत.
पावसाळा संपेपर्यंत ही परिस्थिती राहणार आहे.
पावसाळ्यात पावसामुळे किंवा इतर नैसर्गिक परिस्थितीमुळे
भाजीपाला लवकर खराब होतो किंवा सडतो.
आधीच उत्पादन कमी त्यात भाजीपाला खराब होत असल्याने
बाजारातील आवक कमी होते परिणामी भाव वाढतात.
सध्याच्या परिस्थितीत भाजी बाजारामध्ये बटाटे ४० रुपये किलो, वांगी ६० रुपये किलो,
टोमॅटो ८० रुपये किलो, पालक ८० रुपये किलो, घोळ, चवळी, ६० रुपये किलो,
गवार ८० रुपये किलो, चवळीच्या शेंगा ८० रुपये किलो, भेंडी ८० रुपये किलो,
लसन २०९ रुपये किलो, अद्रक १६० रुपये किलो, कोथिंबीर २०० रुपये किलो,
गंगाफळ ४० रुपये किलो, फूलकोबी ८० रुपये किलो, पत्ताकोबी ६० रुपये किलो,
मेथी ८० रुपये किलो, शेपू ८० रुपये किलो, कारले ६० रुपये किलो,
गिलके ८० रुपये किलो, असे पालेभाज्या व फळभाज्यांचे भाव आहेत.
भाज्यांना पर्याय नाही आणि रोजच्या दोन वेळेच्या जेवणात भाज्या लागतातच.
त्यामुळे दर वाढले तरी नागरिकांना
दररोज पालेभाज्या व फळभाज्या विकत घ्याव्या लागत आहेत.
जांभूळ बाजारात दाखल
दरवर्षी पावसाळ्याच्या प्रारंभी बाजारात जांभूळ या फळाचे आगमन होते.
यावर्षी सुद्धा बाजारात जांभूळ दाखल झाले आहेत.
आंबट, गोड, तुरट अशा मिश्र चवीचे जांभूळ आरोग्यासाठी फायदेकारक मानले जाते.
विशेष करून शुगरच्या रुग्णांसाठी जांभूळ फायदेकारक असल्याचे सांगितले जाते.
त्यामुळे जांभूळांना बाजारात मोठी मागणी असते.
यावर्षीही जांभूळ बाजारात दाखल होताच मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे.
रानभाज्यांची प्रतीक्षा
पावसाळा प्रारंभ झाल्यानंतर दरवर्षी बाजारपेठेमध्ये
विविध प्रकारच्या रानभाज्या विक्रीसाठी येतात.
या रानभाज्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेकारक मानल्या जातात.
पावसाळ्याच्या दोन महिन्यातच रानभाज्या मिळतात.
त्यामुळे बरेच नागरिक ह्या रानभाज्या खरेदी करतात.
अकोल्यात रानभाज्यांचा महोत्सव सुद्धा साजरा केला जातो.
पावसाळा प्रारंभ झाल्याने आता अनेक नागरिक या रानभाज्यांची प्रतीक्षा करीत आहेत.