पाकिस्तानी नागरिकांसाठी अमेरिकेत प्रवेशबंदी? ट्रम्प मोठ्या निर्णयाच्या तयारीत!

पाकिस्तानी नागरिकांसाठी अमेरिकेत प्रवेशबंदी? ट्रम्प मोठ्या निर्णयाच्या तयारीत!

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या मागील कार्यकाळात 7 मुस्लिम देशांच्या नागरिकांना अमेरिकेत येण्यापासून रोखले होते.

या देशांमध्ये इराण, इराक, लिबिया, सोमालिया, सुदान, सीरिया आणि येमेन यांचा समावेश होता.

ट्रम्प यांनी अफगाणिस्तान आणि पाकिस्तानवरही प्रवासी बंदी घातली तर ही संख्या 9 होऊ शकते.

Related News

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

जगभरात ट्रम्पच्या टैरिफ वॉरची दहशत सुरु असताना पाकिस्तानला मोठा झटका ट्रम्प देणार आहे.

न्यूज एजन्सी रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प अमेरिकेत पाकिस्तान आणि

अफगाणिस्तानमधील नागरिकांना प्रवेश करण्यापासून रोखणार आहे.

सुरक्षेच्या कारणावरुन ट्रम्प या दोन देशांतील नागरिकांना अमेरिकेत येण्यास बंदी घालण्याच्या तयारीत आहेत.

यापूर्वी ट्रम्प यांनी त्यांच्या मागील काळात सात मुस्लीम देशांतील नागरिकांना अमेरिकेत येण्यास बंदी घातली होती.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील नागरिकांना

बंदी घालण्याचा आदेश पुढील आठवड्यात काढण्याची शक्यता आहे.

हा निर्णय अमेरिकेची सुरक्षा आणि त्या देशामधील नागरिकांपासून असणारा धोका लक्षात घेऊन घेण्यात येणार आहे.

या निर्णयात पाकिस्तान, अफगाणिस्तानशिवाय इतर काही देश असू शकतात. परंतु त्याची नावे अजून समजली नाही.

ट्रम्प यांनी त्यांच्या आधीच्या कार्यकाळातही अशीच बंदी घातली होती. ज्यामध्ये 7 मुस्लिम देशांचा समावेश होता.

मात्र, 2021 माजी राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी ही बंदी हटवली होती.

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या मागील कार्यकाळात 7 मुस्लिम देशांच्या नागरिकांना अमेरिकेत येण्यापासून रोखले होते.

या देशांमध्ये इराण, इराक, लिबिया, सोमालिया, सुदान, सीरिया आणि येमेन यांचा समावेश होता.

ट्रम्प यांनी अफगाणिस्तान आणि पाकिस्तानवरही प्रवासी बंदी घातली तर ही संख्या 9 होऊ शकते.

ट्रम्प यांनी अफगाणिस्तानला ही बंदी घातली तर हजारोंच्या संख्येने अमेरिकेत आलेल्या अफगाणी लोकांवर संकट कोसळणार आहे.

तालिबान राजवटीमुळे ते लोक अफगाणिस्तान सोडून अमेरिकेत आले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची सूत्र घेताच 20 जानेवारी रोजी एक आदेश काढला होता.

त्यात, विदेशातील लोकांना अमेरिकेत प्रवेश करण्याची प्रक्रिया अधिक कठोर करण्याचे निर्देश दिले होते.

ज्या लोकांपासून राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येऊ शकते, त्यांची ओळख समजावी यासाठी हा आदेश काढले होते.

ज्या धोकादायक लोकांना अमेरिकेत प्रवेश करण्यापासून रोखता येईल, त्यांची यादी तयार करण्याचे ट्रम्प यांनी सांगितले होते.

Read more news here :
https://ajinkyabharat.com/chhava-chitrapat-shashanachaya-doordarshan-sahyadri-vahineevar-mofat-vineyat-yava/

Related News