“पाकिस्तानच्या विनाशापर्यंत दाढी-मिशी नाही”

"पाकिस्तानच्या विनाशापर्यंत दाढी-मिशी नाही" – बलियातील शेतकऱ्याची अजब प्रतिज्ञा

बलिया | प्रतिनिधी

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे.

या हल्ल्याला विरोध करत उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील एक शेतकरी

Related News

चक्क पाकिस्तानच्या विनाशापर्यंत दाढी-मिशी न करण्याची प्रतिज्ञा घेतली आहे.

‘अनपढ पण देशभक्त’ शेतकरी चर्चेत

बलियातील पटखौली गावचे निवासी नवीन कुमार राय उर्फ चुन्ना राय हे स्वतःला ‘अनपढ गावंरडा शेतकरी’ म्हणवतात.

मात्र, देशप्रेमाच्या बाबतीत त्यांची भावना प्रखर आहे. ते आजवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना

तब्बल ५० पत्रं पाठवून आपला पाठिंबा दर्शवत आले आहेत

. यापैकी काही पत्रांना खुद्द पंतप्रधान कार्यालयाकडून उत्तर देखील मिळालं आहे.

“पाकिस्तान नष्ट होईपर्यंत न दाढी करणार, न मिशी”

पहलगाम हल्ल्याने व्यथित झालेल्या राय यांनी जाहीर केले की, “जेव्हा पर्यंत पाकिस्तान नष्ट होत नाही,

तेव्हा पर्यंत मी दाढी आणि मिशी कट करणार नाही.” त्यांनी स्पष्टपणे म्हटलं,

“मोदीजींच्या एका आदेशावर आम्ही शेतकरी देशासाठी रणभूमीत उतरण्यास तयार आहोत.

फरसा आणि पारंपरिक हत्यारे घेऊनही सीमा पार करू.”

“बलियाचे बागी पुन्हा सज्ज!”

इतिहासात स्वातंत्र्य चळवळीतील योगदानासाठी ओळखले जाणारे बलिया जिल्हा,

आता पुन्हा एकदा ‘बागी तेवरात’ दिसत आहे. राय म्हणतात, “पाकिस्तान बलियाचे नाव ऐकून थरथरेल.

देश संकटात असताना आम्ही मागे हटणार नाही.”

या शेतकऱ्याची ही अजब प्रतिज्ञा आणि देशभक्ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

जिथे अनेकजण निषेधाच्या पोस्ट्समध्ये अडकतात, तिथे नवीन कुमार राय यांची ही कृती देशप्रेमाचं एक वेगळंच उदाहरण ठरत आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/jatnaiya-cangencannasathi-modi-sarkarcha-motha-decision/

Related News