आंतरराष्ट्रीय राजकारणात एक मोठा भूकंप झाल्याचं चित्र दिसत आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढाकारातून तयार करण्यात आलेल्या गाझा शांती प्रस्तावाला पाकिस्तानने सरळ पाठिंबा देण्यास नकार दिला आहे. जगभरात अमेरिका आणि पाकिस्तान हे पारंपारिक मित्र राष्ट्र मानले जातात. परंतु आता पाकिस्तानने अमेरिकेला पाठीशी न उभे राहून घेतलेला हा यु-टर्न अमेरिकेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. या निर्णयामुळे ट्रम्प प्रशासनाला मोठी राजनैतिक चपराक बसल्याचं समजतंय. कारण ट्रम्प यांनी स्वतः जाहीर केले होते की पाकिस्तान त्यांचा शांती प्रस्ताव “शंभर टक्के” समर्थन करेल. मात्र प्रत्यक्ष प्रस्ताव समोर आल्यानंतर पाकिस्तानने त्याच्याशी स्वतःला अलिप्त ठेवत, अमेरिकेला “मित्राच्या मुखवट्यातील दगा” दिला आहे.
मंगळवारी पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री इशाक डार यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट शब्दात म्हटलं “हा प्रस्ताव आमचा नाही! अमेरिकेने तयार केलेल्या या योजनेत मुस्लिम राष्ट्रांच्या मुख्य मागण्यांचा विचार केलेला नाही. त्यामुळे आम्ही या योजनेचं समर्थन करू शकत नाही.” डार यांनी सांगितलं की, ट्रम्प यांच्या प्रस्तावात गाझामधील युद्धविराम, मानवीय मदत, आणि जबरदस्तीने होणाऱ्या स्थलांतरावर बंदी या महत्त्वाच्या मुद्यांचा समावेशच नाही. त्यामुळे पाकिस्तानला हा प्रस्ताव स्वीकारणं अशक्य आहे. यापूर्वी ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत आत्मविश्वासाने सांगितलं होतं की “पाकिस्तान हा प्रस्ताव शंभर टक्के स्वीकारेल. आमच्या योजनेला मित्र राष्ट्रांचा पाठिंबा मिळणारच.”
पण जसा प्रस्ताव जगासमोर आला, तसा पाकिस्तानने पाठी मागे घेतली. ट्रम्प प्रशासनासाठी हा मोठा राजनैतिक फटका ठरतोय. अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध पूर्वीपासून ताणलेले असतानाही, ट्रम्प यांनी पाकिस्तानवर ठेवलेला भरोसा आता “तोंडावर आपटला” असं म्हणावं लागेल. सर्वात गोंधळात टाकणारी बाब म्हणजे, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी काही तासांपूर्वीच ट्रम्प यांच्या प्रस्तावाचं स्वागत केलं होतं! त्यांनी म्हटलं होतं , “डोनाल्ड ट्रम्प यांनी जो वीस पॉइंट्सचा प्रस्ताव मांडला आहे, त्याचा उद्देश गाझामधील युद्ध थांबवणे हा आहे. आम्ही या प्रस्तावाचं स्वागत करतो.” मात्र काही तासांतच पाकिस्तानचं धोरण बदललं आणि त्यांनी “हा आमचा प्रस्ताव नाही” असं जाहीर केलं. या वळणामुळे आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये पाकिस्तानच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. डार यांनी सांगितलं की पाकिस्तानने ज्या आठ मुस्लिम देशांसोबत समन्वय साधला आहे, त्यांच्या मागण्या आणि अमेरिकेच्या प्रस्तावातील मुद्दे यांमध्ये मोठं अंतर आहे. मुस्लिम राष्ट्रांच्या मुख्य मागण्या होत्या: तात्काळ युद्धविराम, गाझातील नागरिकांना मानवी मदत, इस्रायलच्या दबावाखाली होणाऱ्या जबरदस्ती स्थलांतरावर बंदी.
Related News
अमेरिकेच्या प्रस्तावात हे मुद्दे दुय्यम ठरवण्यात आले, त्यामुळे पाकिस्तानसाठी समर्थन करणं अवघड ठरलं. या घटनेनंतर जगभरातील माध्यमांमध्ये चर्चा सुरू आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाला मोठा धक्का बसल्याचं विश्लेषण करण्यात येत आहे. “पाकिस्तानवर अमेरिकेचा विश्वास बसवणं ही चूक ठरली” असं काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे .तर काहींचं म्हणणं आहे की, पाकिस्तान आपली नवी परराष्ट्र धोरण रचना चीन आणि इस्लामी राष्ट्रांच्या बाजूने वळवतोय. गेल्या काही वर्षांत पाकिस्तानने अमेरिकेशी असलेले संबंध थोडे शिथिल केले आहेत. चीनसोबतचे आर्थिक आणि लष्करी संबंध वाढले आहेत.अरब राष्ट्रांशी जवळीक साधली आहे. इस्लामी राष्ट्रांच्या गटात आपली भूमिका मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्या प्रस्तावाला पाठिंबा न देणं म्हणजे पाकिस्तानचा स्पष्ट राजकीय संदेश आहे ,”आम्ही आता अमेरिकेच्या मागे नाही, आमचं स्वतःचं धोरण आहे!” ट्रम्प यांच्या शांती प्रस्तावाचं उद्दिष्ट गाझामधील संघर्ष थांबवणं होतं. पण प्रस्तावात इस्रायलला मोठा फायदा मिळेल अशी अट होती. मुस्लिम राष्ट्रांनी याला विरोध दर्शवला. पाकिस्तानच्या या निर्णयामुळे ट्रम्प यांच्या “मिडल ईस्ट पीस व्हिजन” वर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
या घटनेमुळे मध्यपूर्वेतील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. इस्रायल-अमेरिका युती अधिक घट्ट होईल. पाकिस्तान इस्लामी राष्ट्रांबरोबर अधिक आक्रमक भूमिका घेईल. अमेरिका-पाकिस्तान संबंधांमध्ये आणखी दुरावा वाढेल. तज्ज्ञांच्या मते, हा निर्णय भविष्यात नव्या गटांची निर्मिती करू शकतो, ज्यामध्ये अमेरिका एकटी पडू शकते. आता सर्वांचे लक्ष ट्रम्प यांच्या प्रतिक्रियेवर आहे. ते पाकिस्तानवर राजनैतिक दबाव आणतील का? की पुन्हा नवा प्रस्ताव मांडून मुस्लिम राष्ट्रांना पटवून घेण्याचा प्रयत्न करतील? या सर्व गोष्टी पुढच्या काही दिवसांत स्पष्ट होतील. पाकिस्तानचा अमेरिकेला दिलेला हा “राजनैतिक दगा” फक्त ट्रम्प यांच्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण अमेरिकन परराष्ट्र धोरणासाठी मोठं आव्हान आहे. अमेरिकेचा मित्र देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाकिस्तानने अशा प्रकारे हात झटकणं म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणात नव्या समीकरणांचा उदय आहे.
read also:http://ajinkyabharat.com/khadatar-ho-or-actress-ayushya/