PAK vs NZ : पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या मुलाने पाकिस्तानला पराभूत केलं, कसं काय कनेक्शन ते जाणून घ्या

PAK vs NZ : पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या मुलाने पाकिस्तानला पराभूत केलं, कसं काय कनेक्शन ते जाणून घ्या

न्यूझीलंडने पाकिस्तानविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 344 धावा केल्या, तर पाकिस्तानचा संघ 271 धावांवर ऑलआउट झाला.

न्यूझीलंडने या सामन्यात 77 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात पदार्पण करणाऱ्या मुहम्मद अब्बासने एक शानदार विक्रम रचला आहे आणि पाकिस्तानच्या पराभवाला कारणीभूत ठरला.

नेपियरमधील मॅकलीन पार्क मैदानावर पाकिस्तानविरुद्ध स्फोटक अर्धशतक झळकावून मोहम्मद अब्बासने नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे.

Related News

विशेष म्हणजे त्याने त्याच्या पदार्पणाच्या सामन्यातच स्फोटक फलंदाजी दाखवली.

पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मुहम्मद अब्बासने केवळ 24 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.

त्याने त्याच्या एकदिवसीय पदार्पणात सर्वात कमी चेंडूंमध्ये अर्धशतक करण्याचा विश्वविक्रम केला.

यापूर्वी हा विक्रम टीम इंडियाच्या कृणाल पंड्याच्या नावावर होता. 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण

करणाऱ्या पंड्याने फक्त 26 चेंडूत अर्धशतक झळकावून हा विश्वविक्रम केला. आता मुहम्मद अब्बासने हा विक्रम मोडला आहे.

मोहम्मद अब्बासने पाकिस्तानविरुद्ध अवघ्या 24 चेंडूत अर्धशतक पूर्ण करून एकदिवसीय पदार्पणात फलंदाज म्हणून सर्वात जलद

अर्धशतक करण्याचा विश्वविक्रम केला आहे. या सामन्यात त्याने 26 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांसह 52 धावा केल्या.

मुहम्मद अब्बास हा माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू अझहर अब्बासचा मुलगा आहे. अझहर 90 च्या दशकात पाकिस्तानकडून खेळला आणि नंतर न्यूझीलंडमध्ये स्थलांतरित झाला.

त्याला तिथले नागरिकत्व मिळाले होते. आता, अझहर अब्बासचा मुलगा मुहम्मद अब्बासने पाकिस्तानविरुद्ध खेळून न्यूझीलंडसाठी त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली आहे.

 

Related News