पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा परिणाम हवाई वाहतुकीवर

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा परिणाम हवाई वाहतुकीवर

नवी दिल्ली:

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा परिणाम आता देशाच्या हवाई वाहतुकीवरही जाणवू लागला आहे.

अनेक उड्डाणे विलंबाने होत असून त्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

Related News

आंतरराष्ट्रीय हवाई क्षेत्र बंद

या विलंबाचे मुख्य कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय हवाई क्षेत्र काही भागात बंद करण्यात आले आहे.

त्यामुळे उड्डाणांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे.

यामुळे प्रवासाचा मार्गही लांब झाला आहे आणि प्रवासाचा कालावधीही वाढला आहे.

 सरकारकडून महत्त्वाची अ‍ॅडव्हायजरी

या पार्श्वभूमीवर सरकारने एक अधिकृत अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे. त्यात म्हटले आहे की:

  • उड्डाणांमध्ये प्रत्याप्त इंधनाचा साठा असणे बंधनकारक आहे.

  • प्रवाशांसाठी खाण्यापिण्याची सोय पुरवण्याची जबाबदारी विमान कंपन्यांवर असेल.

  • प्रवाशांनी संभाव्य विलंब लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे.

सरकारने स्पष्ट केले आहे की, अंतरराष्ट्रीय हवाई क्षेत्र बंद असल्यामुळे उड्डाणांना अधिक वेळ लागू शकतो

आणि काही वेळा प्रवासादरम्यान अन्य ठिकाणी थांबा करावा लागू शकतो.

 प्रवाशांसाठी सूचना

प्रवाशांनी प्रवासासाठी थोडा अधिक वेळ राखून ठेवावा, तसेच आवश्यक त्या वैयक्तिक वस्तू, औषधे आणि अन्नपदार्थ सोबत ठेवावेत, असा सल्ला देण्यात आला आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/bharate-pakistan-operation-operation-tayar-motha-judging-paul-uchalnar/

Related News