पहलगाम हल्ल्यामागे हमासचं नवं कनेक्शन उघड

पहलगाम हल्ल्यामागे हमासचं नवं कनेक्शन उघड

दिल्ली/श्रीनगर –

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास करत असलेल्या राष्ट्रीय

तपास यंत्रणेला (NIA) धक्कादायक माहिती हाती लागली आहे.

Related News

या हल्ल्यामागे केवळ पाकिस्तानपुरताच मर्यादित कट नसून, आता पाकव्याप्त काश्मीरमध्ये हमासच्या सक्रीय उपस्थितीचा धक्कादायक पुरावा समोर आला आहे.

त्यामुळे दहशतवाद्यांच्या नव्या युतीचा मोठा खुलासा झाला आहे.

 पहलगाम हल्ल्यात लष्कर, ISI आणि हमासचा सहभाग?

NIAच्या तपासात समोर आलं की, दहशतवाद्यांनी बेताब खोऱ्यात हत्यारं लपवली होती.

हल्ल्याचं संपूर्ण नियोजन लष्कर-ए-तैयबा, ISI आणि पाकिस्तानच्या सहकार्याने केलं गेलं होतं.

यातच आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली – हमास ही पॅलेस्टिनी जिहादी संघटना देखील या नेटवर्कशी संबंधित असल्याचे संकेत मिळाले आहेत.

 व्हिडीओ समोर, हमासची पाकव्याप्त काश्मीरमधील एन्ट्री

5 फेब्रुवारी 2025 रोजी पाकव्याप्त काश्मीरमध्ये ‘काश्मीर सॉलिडॅरिटी अँड ऑपरेशन अल-अक्सा फ्लड कॉन्फरन्स’

नावाने आयोजित करण्यात आलेल्या रॅलीमध्ये हमासचे वरिष्ठ प्रतिनिधी सहभागी झाले होते.

या रॅलीमध्ये लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद यांसारख्या संघटनांचाही सहभाग होता.

डॉ. खालेद अल-कदौमी या हमास प्रतिनिधींनी नेतृत्व केले, तर या रॅलीमध्ये पहलगाम हल्ल्यातील काही

संशयित दहशतवादीही उपस्थित होते, अशी माहिती तपास संस्थांना मिळाली आहे.

 भारताविरोधात उघड उघड धमक्या

या रॅलीदरम्यान व्यासपीठावरून भारताविरोधात खुलेपणाने धमक्या दिल्या गेल्या.

या कार्यक्रमाचे व्हिडीओ आणि इतर पुरावे सध्या तपास यंत्रणांच्या हाती असून, हे गंभीर सुरक्षा आव्हान असल्याचं गृहमंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.

 कोण आहे हमास?

स्थापना : 1987, मुस्लिम ब्रदरहुडच्या इस्लामी विचारसरणीवर आधारित

सत्ता : 2007 पासून गाझापट्टीवर पूर्ण सत्ता

उद्दिष्ट : इस्रायलचा संपूर्ण नाश

समर्थन : इराण, सीरिया, लेबनॉनमधील शिया अतिरेकी संघटनांचा पाठिंबा

दहशतवादी हल्ले : 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायलवर मोठा हल्ला करून 300 पेक्षा अधिक नागरिकांची हत्या, शेकडोंना अपहरण

 पहलगाम हल्ल्यावर ‘अल-अक्सा’च्या हल्ल्याची छाया

विशेष म्हणजे, पहलगाम हल्ला इस्रायलमधील ‘ऑपरेशन अल-अक्सा फ्लड’च्या धर्तीवर घडवण्यात आल्याचंही तपासात उघड होत आहे.

त्यामुळे जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हालचाली आंतरराष्ट्रीय स्तरावर नव्या स्वरूपात विकसित होत असल्याची शक्यता आहे.

 राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका

हमासची पाकव्याप्त काश्मीरमधील उपस्थिती ही केवळ इस्रायलसाठीच नव्हे तर भारतासाठीही धोका ठरू शकते.

पाकिस्तानच्या मदतीने हमास काश्मीरमध्ये पाळेमुळे रोवण्याचा प्रयत्न करत असल्याने भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेवर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागे केवळ स्थानिक नव्हे, तर जागतिक जिहादी नेटवर्क कार्यरत असल्याचे स्पष्ट होत आहे.

हमाससारख्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांची काश्मीरमध्ये एन्ट्री ही भारतासाठी नवीन सुरक्षेची आव्हानं उभी करत आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/bhendavachya-ghatmandani-bhakit-jaheer/

 

Related News