श्रीनगर | प्रतिनिधी
जम्मू-कश्मीरच्या पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षाबळांनी
जोरदार प्रतिकार करत निर्णायक कारवाई केली आहे. हल्ल्यात सहभागी असलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या दोन
Related News
निवासी वसतिगृहात रॅगिंगचा धक्कादायक प्रकार अधिकाऱ्यांकडून प्रकरण दडपण्याचा आरोप….
🇮🇳 पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात संतापाची लाट; पाकिस्तानात शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांबाबत चर्चेला उधाण
मलेरियाचा धोका कायम! महाराष्ट्रात पुन्हा वाढले रुग्ण; लक्षणं, कारणं आणि खबरदारी जाणून घ्या
अतिरेक्यांची बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न करताना दिला जीव
हृदयद्रावक घटना! ७ वर्षांनी झालेलं बाळ
कारवाईचे संकेत! भारत 7 दिवसांत पाकिस्तानवर मोठा वार करू शकतो….
उष्णतेचा चटका!
पहलगाम हल्ल्यानंतर संतापाची लाट
श्रीनगरमध्ये अडकलेल्या अकोल्याच्या सहा नागरिकांना परत
“आता बस्स! आतंकवाद संपवाच – मुर्तीजापुरातून संतप्त आवाज”
मरणातही जर सन्मान नसेल, तर जिवंतपणी न्यायाची अपेक्षा कशी करायची?”
पळसो बढेतील कासमपुरात चोरट्यांचा प्रवेश;
दहशतवाद्यांपैकी एका – आसिफ शेख – याचे घर स्फोटाच्या सहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आले असून,
दुसऱ्या दहशतवादी आदिलच्या घरावर बुलडोजर चालवण्यात आला आहे.
दहशतवाद्यांचे घर उद्ध्वस्त; सुरक्षा यंत्रणांचा मोठा मोर्चा
२२ एप्रिल रोजी बैसरन व्हॅली (पहलगाम) येथे झालेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी कठोर कारवाईचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर त्रालमध्ये सुरक्षा यंत्रणांनी मोठा मोर्चा उघडला.
स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, दहशतवादी आसिफ शेखच्या घरात मोठ्या प्रमाणात स्फोटकं होती,
ज्यात मोठा स्फोट झाला. त्याचा संपूर्ण घर उद्ध्वस्त झालं आहे. दुसरीकडे,
आदिल या दुसऱ्या दहशतवाद्याच्या घरावर बुलडोजर चालवून कारवाई करण्यात आली.
व्हायरल व्हिडिओतून ओळख; दोघेही लष्करशी संबंधित
हल्ल्यानंतर लष्कर-ए-तैयबाशी संबंधित दहशतवाद्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता,
ज्यात आसिफ व आदिल यांची ओळख पटली.
ते हल्ल्यात सहभागी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सुरक्षाबळांनी त्यांच्यावर कारवाई सुरू केली.
या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी अनंतनागचा
आदिल शहा वगळता उर्वरित सर्वजण हिंदू धर्मीय होते.
गुरुवारी बहुतांश मृतांना अखेरचा निरोप देण्यात आला.
NIA चौकशीत व्यस्त, लष्कर-CRPFचा शोधमोहीम सुरू
दहशतवादी धर्म विचारून गोळ्या झाडत होते, असा आरोप आहे. त्यामुळे या घटनेची चौकशी NIA
(राष्ट्रीय तपास संस्था) करत असून, भारतीय लष्कर, जम्मू काश्मीर
पोलिस आणि इतर सुरक्षा यंत्रणा संयुक्तपणे मोहिम राबवत आहेत.
सुरक्षाबळांनी आतापर्यंत २००० लोकांची चौकशी केली असून, अनेकांना ताब्यात घेतलं आहे.
हल्ल्यात सहभागी अन्य दहशतवाद्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.
गुप्तचर यंत्रणांचं मत आहे की हे दहशतवादी अजूनही पहलगाम परिसरातच लपलेले असण्याची शक्यता आहे.
Read Also :https://ajinkyabharat.com/comes-come-terrorism/