“चौकी बंद, नागरिक असुरक्षित

नागरिक

कामरगाव परिसरात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

कामरगाव :कायद्याचे दरवाजे अन्यायाविरुद्ध नेहमी खुले असतात, पोलीस हे त्याचे प्रथम संरक्षणकर्ते मानले जातात. मात्र, पोलिसांकडूनच कर्तव्यच्युती झाल्यास सामान्य नागरिकांच्या सुरक्षेवर गदा येते, हे वास्तव काल कामरगावात उघडकीस आले.धनज बु पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कामरगाव पोलीस चौकीला दिनांक ९ सप्टेंबर रोजी थेट कुलूप ठोकण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे यांनी सर्वच कर्मचाऱ्यांना घेऊन धनज येथे जेवणासाठी रवाना झाल्याने चौकी बंद पडली. यामुळे गावात आणि परिसरात अवैध धंदेवाले निर्भय झाले, असा आरोप स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.कामरगाव चौकीअंतर्गत तब्बल २५ गावे येतात. याचबरोबर कारंजा–अमरावती महामार्गावर अपघातांची मालिका सुरू असते. अशा परिस्थितीत चौकी कुलूपबंद ठेवणे कितपत योग्य, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.गावात काल गणेश विसर्जनाची मिरवणूक शांततेत पार पडली होती, तर आज ईद-ए-मिलादची मिरवणूक सकाळी पार पडली. या पार्श्वभूमीवर चौकी बंद असल्याने सुरक्षेचा प्रश्न अधिकच ऐरणीवर आला आहे. कामरगाव हे अति संवेदनशील गाव मानले जाते. त्यामुळे अशा बेफिकीर वागणुकीबाबत उपनिरीक्षक शिंदे यांची चौकशी व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

read also : https://ajinkyabharat.com/shetkayancharya-adchananwar-theate-fetun-measures-plan/

Related News

Related News