श्री शिवाजी विद्यालयात डॉ. भाऊसाहेब देशमुख जयंती उत्सवाचे आयोजन

शिवाजी विद्यालयात

अकोट – अकोट येथील श्री शिवाजी विद्यालयात शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२७ व्या जयंती उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा उत्सव दिनांक २४ ते २९ डिसेंबर दरम्यान विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा कार्यक्रमांसह साजरा केला जाणार आहे.

२४ डिसेंबर रोजी जयंती उत्सवाचे औपचारिक उद्घाटन सोहळा संपन्न होईल. उद्घाटन सोहळ्यात माजी आमदार संजय गावंडे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. तर उद्घाटक म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारणी सदस्य सुरेशदादा खोटरे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती अकोट पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मधुकर सूर्यवंशी यांनी ठेवल्या असून विशेष अतिथी म्हणून संस्थेचे कार्यकारणी सदस्य प्रा. सुभाषराव बनसोड, शाळा समिती सदस्य प्रकाशराव खनक, विशेष निमंत्रीत सदस्य जयदेवराव साबळे, आईदान कलंत्री, शाळा तपासणी अधिकारी उद्धवराव विखे आणि गजानन महाराज विद्यालय अकोली जहागिरीचे शिक्षक श्याम मानकर उपस्थित राहणार आहेत.

उत्सवाच्या पहिल्या दिवशी दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत गीतगायन स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेचे प्रमुख उपस्थितीत प्रा. डॉ. प्रतिभा पवित्रकार व प्रा. सौ. अंजली खोटरे राहणार आहेत. तसेच वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली असून नरसिंग कमवीचे डॉ. गोपाल राठोड वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. दुपारी १.३० वाजता बचाव स्पर्धा राजेंद्र थुटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडेल. याच दिवशी वर्ग ५ ते ७ चा सांस्कृतिक कार्यक्रम दुपारी ३ वाजतापासून सादर होणार आहे.

Related News

२६ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता शहराच्या मुख्य मार्गावर शोभायात्रा व प्रभातफेरी काढण्यात येईल. दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत वर्ग ८ ते १२ चे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडतील. या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी गायन, नृत्य, अभिनय व इतर सांस्कृतिक कौशल्य सादर केले जाणार आहेत.

२७ डिसेंबर रोजी शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण सोहळा संपन्न होईल. यावेळी संस्थेचे सर्व कार्यकर्ते व शिक्षक उपस्थित राहून त्यांच्या योगदानाची सन्मान व्यक्त करतील.

उत्सवाचा समारोप २९ डिसेंबर रोजी बक्षीस वितरण कार्यक्रमासह होईल. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. गजाननराव पुंडकर राहणार आहेत. प्रमुख उपस्थिती संस्थेचे उपाध्यक्ष केशवराव मेतकर व अकोट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमोल माळवे ठेवलेली आहे. तर विशेष अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष अॅड. ब्रिजमोहन गांधी, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सभासद सदाशिवराव कराळे, दिनकरराव ठाकरे, आत्माराम पांडे, नंदकिशोर बागडी तसेच शाळा तपासणी अधिकारी प्रकाशराव अंधारे उपस्थित राहणार आहेत.

या जयंती उत्सवात विद्यार्थ्यांना शैक्षणिक व सांस्कृतिक कौशल्यांचा विकास साधता येईल, तसेच शिक्षण महर्षी भाऊसाहेब देशमुख यांच्या शिक्षणतत्त्वांचे स्मरण करून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण आणि संस्कृतीसंबंधी जागरूकता वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.शिवाजी विद्यालयाच्या या सहा दिवसीय उत्सवामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतिभा वर्धित करण्यास निश्चितच मोठे योगदान होणार आहे.

read also : https://ajinkyabharat.com/vijay-pajais-health-is-wealth-project-selected-first-for-district-level-science-exhibition/

Related News