भय्याजी जोशी यांच्या मुंबईतील मराठी भाषेबाबतच्या वक्तव्यामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे.
राज ठाकरे यांनी या वक्तव्याचा कडाडून निषेध केला आहे. विरोधकांनीही या विधानावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विधानाचा निषेध नोंदवत आहे आणि मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही हे जोशीबुवांनी लक्षात ठेवावं ! असा इशारा त्यांनी दिला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी मुंबईतील मराठी भाषेबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे.
Related News
यामुळे राज्यातील वातावरण चांगलंच पेटलेलं आहे.
संजय राऊत, भास्कर जाधव, आदिच्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधकांनी त्यांच्या या विधानावर कडाडून टीका केली आहे.
त्याच्या या विधानाने वादाची ठिणगी चांगलीच पेटली आहे.
दरम्यान, मराठी माणसाच्या हक्कासाठी, मराठी भाषेच्या वापरासाठी आग्रही भूमिका घेणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख,
राज ठाकरे यांनीही भय्याजी जोशी यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे.
फसेबूक या सोशल मीडिया नेटवर्किग साईटवरील अधिकृत अकाऊंटवर राज ठाकरे यांनी एक पोस्ट शेअर करत भय्याजी
जोशींच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. राजकारण करताना आपण स्वतः मराठी आहोत याचं भान पण जोशींनी सोडाव ?
असा सवालही राज ठाकरेंनी विचारला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विधानाचा निषेध नोंदवत आहे
आणि मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही हे जोशीबुवांनी लक्षात ठेवावं ! असा इशाराही त्यांनी दिला.
काय आहे राज ठाकरे यांची पोस्ट ?
देशाची झालेली भाषावार प्रांत रचना, त्यात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून १०६ हुतात्म्यांनी दिलेलं
बलिदान या सगळ्याबद्दल भय्याजी जोशींना माहीत नसेल असं अजिबात नाही.
पण कायम महाराष्ट्राबद्दलच किंवा मराठीबद्दलची अशी विधाने करायची याचं कारण काय ?
भय्याजी जोशींनी असंच विधान बेंगळुरू किंवा चेन्नईत करून दाखवावं…. आणि भय्याजी जोशींच्या या विधानाशी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष सहमत आहे का ?
उद्या समजा संघाच्या सोडाच इतर कुठल्याही जबाबदार व्यक्तीने असं विधान जर इतर राज्यात केलं
असतं तर त्या राज्यातील सर्व पक्षांनी निषेध नोंदवला असता… भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या अस्मितेला प्राधान्य देऊन निषेध नोंदवणार आहे का ?
सध्या MMR रिजन मधे चाललेला विकास आणि त्यामागील राजकीय हेतू हे जोशींच्या वक्तव्यातून सुरवात होताना दिसत आहेत .
हे काय चाललय हे न समजण्या इतकी मराठी जनता दुधखुळी नाही हे जोशींनी लक्षात घ्यावं !
हे राजकारण करताना आपण स्वतः मराठी आहोत याचं भान पण जोशींनी सोडाव ?
आत्ताच कोल्डप्ले नावाचा वाद्यवृंद मुंबईत येऊन गेला , त्याचे मुख्य गायक ख्रिस मार्टिन हे देखील इथे येउन मराठीत बोलून गेले .
त्या ब्रिटिश माणसालाही मुंबईत कोणती भाषा चालते आणि ही मुंबई कोणाची आहे हे समजते तर मग जोशी बुवांना हे समजू नये ?
या असल्या काड्या घालून ( अर्थात राजकीय हेतू असल्या शिवाय हे होणे नाही )
नवा संघर्ष आपण उदयाला आणत आहात हे जरूर ध्यानात ठेवावे ! बाकी सविस्तर ३० तारखेला गुढीपाडव्याला बोलूच !
महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विधानाचा निषेध नोंदवत आहे आणि मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही हे जोशीबुवांनी लक्षात ठेवावं !
Read more news here :