‘छावा’विरोधात मत मांडलं, म्हणून मुख्यमंत्र्यांचं नाव घेत कोरटकर धमकी देतोय, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी ऑडिओ क्लीप ऐकवली

'छावा'विरोधात मत मांडलं, म्हणून मुख्यमंत्र्यांचं नाव घेत कोरटकर धमकी देतोय, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी ऑडिओ क्लीप ऐकवली

ब्राम्हणवादी लोकांनी छत्रपती संभाजीराजेंना पकडून

दिल्याचं वक्तव्य इंद्रजीत सावंत यांनी केलं होतं.

कोल्हापूर : इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानावर प्रकाशझोत टाकणाऱ्या बहुचर्चित ‘छावा’

चित्रपटाबद्दल माध्यमांशी बोलताना सावंत यांनी ब्राह्मण द्वेषी विचार मांडल्याचा आरोप होत आहे.

Related News

ब्राम्हणवादी लोकांनी छत्रपती संभाजीराजेंना पकडून दिल्याचं वक्तव्य इंद्रजीत सावंत यांनी केलं होतं.

इंद्रजीत सावंत यांचे विचार ब्राह्मण द्वेषी असल्याचे म्हणत त्यांना धमकी देण्यात आली आहे.

धमकीबाबत साडेसहा मिनिटांचा ऑडिओ खुद्द इंद्रजीत सावंत यांच्याकडून फेसबुकवर शेअर करण्यात आला आहे.

त्यानंतर अल्पावधीतच तो सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन प्रशांत कोरटकर नावाचा एक ‘परशूरामी ब्राम्हण’

धमक्या देत असल्याचं इंद्रजीत सावंत यांनी फेसबुक पोस्टमध्ये ऑडिओ शेअर करताना म्हटलं आहे.

इंद्रजीत सावंत यांची फेसबुक पोस्ट काय?

“मा. मुख्यमंत्री यांचे नाव घेऊन प्रशांत कोरटकर नावाचा एक परशूरामी ब्राम्हण धमक्या देत आहे.

मला अशा धमक्या नवीन नाहीत, पण या xxxचे शिवरायांच्या बद्दलचे विचार किती घाणेरडे आहेत,

यांच्या पोटात श्री शिव छत्रपतीं बद्दल काय विष भरलेले आहे

हे झोपलेल्या मराठा बहुजनांना समजावे म्हणून हे रेकॉर्डिंग व्हायरल करत आहे.

या कोरटकर नावाच्या नागपूरच्या भिक्षूकालाच काय यांच्या बापालाही हा शिवरायांचा मावळा घाबरत नाही.

जय शिवराय!!! इंद्रजित सावंत, 25-2-2025 , कोल्हापूर.” असे सावंत यांनी फेसबुकवर लिहिले आहे.

इंद्रजीत सावंत काय म्हणाले होते?

छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला.

छावा सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरु असताना इतिहास

संशोधक इंद्रजीत सावंत यांनी या चित्रपटाविषयी भाष्य केलं.

छावा सिनेमात इतिहासाचं वेगळ्या पद्धतीनं दर्शन झालं आहे,

असं इंद्रजीत सावंत म्हणाले.

छावा सिनेमात सोयरा बाईसाहेबांना खलनायक दाखवलं गेल्या

चं इंद्रजीत सावंत म्हणाले.

अण्णाजी दत्तो हे छत्रपती संभाजी महाराजांचे खरे खलनायक होते,

असंही इंद्रजीत सावंत यांनी सांगितलं.

विकीपिडीयावर जो खोटा इतिहास लिहिला जातोय तो काढून

टाकायला हवा असंही इंद्रजीत सावंत म्हणाले होते.

Read more news here

https://ajinkyabharat.com/college-tarunankan-karanama-ughdakis-gungicia-drugsah-1-lakh-42-thousand-rupees/

Related News